5 May 2024 9:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

सज्ज व्हा! 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'मुळे जगभरातल्या करोडो नोकऱ्या धोक्यात

मुंबई : आधीच जागतिक स्तरावरील नोकऱ्यांची कमतरता असताना आता ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मुळे म्हणजे तंत्रज्ञानाच्या ऑटोमेशनमुळे रोजगारांवर मोठं संकट येण्याची शक्यता आहे. कारण याच ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मुळे जगभरातील ७ कोटींपेक्षा अधिक जणांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागू शकतात, असा अहवाल एका जग विख्यात संस्थेने प्रसिद्ध केला आहे.

याच ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मुळे मनुष्य करू शकेल अशी अनेक कामं मशिन्सच्या माध्यमातून होतील आणि त्यामुळे कोट्यवधी लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागतील आणि बेरोजगार होण्याची वेळ येईल. अगदी अकाउंटिंग, ड्रायव्हर, डाटाएंट्री पासून ते थेट रिसेप्शन आणि शॉपिंगसारखी असंख्य कामं ही भविष्यात आता मशिन्सच्या माध्यमातूनच होणार आहेत. या ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मुळे चुकांची शक्यताही जवळपास संपुष्टात येते तसेच उत्पादकताही वाढते. त्यामुळं कोणतीही छोटी मोठी मनुष्य आधारित कामं तसेच उच्च दर्जाची काम सुद्धा याच ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मुळे होणार आहेत.

या अहवालात सूचित करण्यात आल्याप्रमाणे पुढील ७ वर्षांमध्ये मनुष्याची अर्ध्यापेक्षा अधिक कामं म्हणजे जवळपास अंदाजे ५२ टक्के कामं ही ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ आधारित मशिन्स करतील. सध्या मनुष्याच्या एकूण कामांपैकी केवळ २९ टक्के कामं ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ आधारित मशिन्स करतात आणि प्रमाण भविष्यात थेट ५२ टक्क्यांवर जाणार आहे. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ आधारित मशिन्समुळे अगदी डॉक्टर्स, प्राध्यापक, पत्रकार, टेक्नेशियन्स, व्हेंडर्स, ऑपरेटर्स, विश्लेषण करणारे तज्ज्ञ, व्हिडीओ एडीटर्स, कॅमेरामन्स अशा एक ना अनेक क्षेत्रांमध्ये नोकरी जाण्याचा मोठा धोका भविष्यात आहे. त्यामुळे उद्योगांची वेतनावर होणारी प्रचंड अर्थशक्ती बचत होणार आहे. त्यामुळे केवळ जगभरातीलच नव्हे तर भारतातील अनेक दिग्गज कंपन्यांनी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’वर प्रचंड गुंतवणूक करण्यास सुरुवात केली असून कामगार, पगार आणि कर्मचाऱ्यांना द्याव्या लागण्याच्या सुविधा या पासून स्वतःची सुटका करण्यासाठी घेण्यासाठी आणि उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी मालकांनी गुणतवणूक खर्ची घालण्याचे निर्णय घेतले आहेत.

आज जी कंपनी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’कडे कानाडोळा करेल ती कंपनी भविष्यात स्वतःचा ‘डायनासोर’ करून घेईल हे सत्य आहे. परंतु संकटात सुद्धा संधी असते हे स्वीकारलं तर “वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम” ने तयार केलेल्या अहवालात AI मुळे सॉफ्टवेअर क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होतील, परंतु त्यासुद्धा ‘इंटेलिजन्स’ असणाऱ्यांनाच मिळतील अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x