6 May 2024 10:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan | SBI कडून 20 वर्षांसाठी गृहकर्ज घ्यायचं आहे का? महिना EMI आणि व्याज किती लागेल जाणून घ्या IPO GMP | IPO आला रे! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, GMP धुमाकूळ घालतेय, संधी सोडू नका Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर
x

Inflation Effect Vegetable Prices Double | दिवाळी पूर्वी लोकांचं दिवाळं | इंधनदरवाढीने भाज्यांचे भाव दुप्पट

Inflation Effect Vegetable Prices Double

मुंबई, २० ऑक्टोबर | पेट्रोल डिझेल नंतर भाजीपाल्याने गाठली शंभरी गाठल्याने वाहनांच्या प्रवासाचा खर्च वाढला आणि परिणामी नाशिकच्या बाजारात भाज्यांचे भाव कडाडले आहेत. भाजी पाल्यांचे भाव दुप्पट झाल्याचं पाहायला मिळतंय. तसेच बाजारात मागणी जास्त अन आवक कमी झाल्याचे देखील परिणाम (Inflation Effect Vegetable Prices Double) दिसत आहेत. त्यामुळे दिवाळी पूर्वीच सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.

Inflation Effect Vegetable Prices Double. After petrol and diesel, the price of vegetables has gone up by hundreds. The prices of vegetables have doubled :

सणांच्या दिवसातही सामान्यांना दिलासा देण्यात आलेला नाही. लोकांच्या आर्थिक अडचणी वाढतील असेच निर्णय रोज सकाळी इंधन कंपन्यांकडून जाहीर होताना दिसतात. परिणामी (Petrol Diesel Price) महागाईचा डोंगर सुद्धा डोक्यावर कोसळत आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा वाढ करण्यात आलीय. सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये लिटरमागे ३५ पैशांनी वाढ केलीय. या दरवाढीबरोबरच ऑक्टोबर महिन्यातील एकूण इंधन दरवाढ ही साडेचार रुपये प्रती लिटरपर्यंत पोहचली आहे. आजची दरवाढ ही या महिन्यातील १५ वी दरवाढ ठरलीय.

इंडियन ऑइल कॉर्परेशन लिमिटेडने आज जारी केलेल्या नवीन दरांनुसार दिल्लीमध्ये इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल १०६.१९ रुपये लिटर तर डिझेल ९४.९२ रुपये लिटरपर्यंत पोहचलं आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचे दर लिटरमागे ११२.११ रुपये तर डिझेलचे दर १०२.८९ रुपयांवर पोहचलेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही.

News Title: Inflation Effect Vegetable Prices Double due to high fuel prices in India.

हॅशटॅग्स

#Inflation(53)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x