18 May 2024 11:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर

Brezza SUV

Brezza | मारुती ब्रेझा देशातील एसयूव्ही सेगमेंटमध्ये खूप लोकप्रिय झाली आहे. कंपनी दरमहिन्याला सरासरी 14,000 हून अधिक युनिट्सची विक्री करत आहे. मार्चमध्ये 14,614 युनिट्सची विक्री झाली.

या महिन्यात कंपनी ब्रेझावर मोठी सूट ही देत आहे. तसे तर कंपनी आपल्या बहुतांश मॉडेल्सवर कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट डिस्काउंट सारख्या ऑफर्स देत आहे. मात्र, कंपनी या एसयूव्हीवर फक्त एक्सचेंज बोनस देत आहे. कारच्या VXi, ZXi आणि ZXi+ पेट्रोल ट्रिम्सवर 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळेल. ही ऑफर 31 मे 2024 पर्यंत वैध असणार आहे.

मारुती ब्रेझाचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
ब्रेझामध्ये नव्या जनरेशनचे के-सीरिज 1.5-ड्युअल जेट डब्ल्यूटी इंजिन देण्यात आले आहे. हे स्मार्ट हायब्रीड तंत्रज्ञानाला सपोर्ट करते. हे इंजिन 6-स्पीड ट्रान्समिशनसह सुसज्ज आहे. हे इंजिन 103hp पॉवर आणि 137Nm पीक टॉर्क जनरेट करते. त्याची इंधन कार्यक्षमताही वाढल्याचा कंपनीचा दावा आहे. नवीन ब्रेझाचे मॅन्युअल व्हेरियंट 20.15 केपी/लीटर मायलेज देईल आणि ऑटोमॅटिक व्हेरिएंट 19.80 केपी/लीटर मायलेज देईल.

यात 360 डिग्री कॅमेरा आहे. हा कॅमेरा अतिशय हायटेक आणि मल्टी इन्फॉर्मेशन कॅमेरा आहे. हा कॅमेरा कारच्या 9 इंचाच्या स्मार्टप्ले प्रो प्लस टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमशी जोडला जाईल. याची निर्मिती सुझुकी आणि टोयोटा यांनी संयुक्तपणे केली आहे. ही इन्फोटेनमेंट सिस्टिम वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कार प्लेला सपोर्ट करते. या कॅमेऱ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे कारच्या आत बसून तुम्ही कारच्या सभोवतालच्या व्हिज्युअल स्क्रीनवर पाहू शकाल.

या कारमध्ये पहिल्यांदाच वायरलेस चार्जिंग डॉक देण्यात आला आहे. या डॉकच्या मदतीने तुम्ही वायरलेस स्मार्टफोन सहज चार्ज करू शकाल. हे फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्याचबरोबर अतिउष्णता टाळण्यासाठी संपूर्ण सुरक्षा व्यवस्थाही करण्यात आली आहे. यात मारुतीचे अनेक कनेक्टिंग फीचर्स देखील मिळणार आहेत. जे या कॉम्पॅक्ट एसयूव्हीला अत्यंत आलिशान आणि अॅडव्हान्स बनवतात.

News Title : Brezza SUV VXi, ZXi ZXi+ discount offer from Maruti Suzuki 05 May 2024.

हॅशटॅग्स

#Brezza(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x