Car Maintenance Tips | कार मेन्टेनन्ससाठी फॉलो करा या 5 टिप्स, कमी खर्चात मिळेल नव्या कारप्रमाणे मायलेजसह अनुभव

Car Maintenance Tips | आजच्या काळात हौसेपेक्षा गाडी ही लोकांची गरज बनली आहे. अधिक मायलेज आणि बॅटरी परफॉर्मन्ससाठी लोक महागड्या आणि मोठ्या ब्रँड कार खरेदी करण्यास प्राधान्य देतात. अशा परिस्थितीत गाडी जितकी महाग तितकी तिचा मेंटेनन्स खर्च होतो. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुमची कार नव्या कारप्रमाणे अधिक मायलेज तर देईलच, शिवाय देखभालीचा खर्चही कमी करेल. आज आम्ही तुम्हाला कार मेंटेनन्सशी संबंधित काही टिप्स सांगत आहोत, ज्यामुळे तुमच्या कारचं आयुष्य आणि मायलेज दोन्ही वाढू शकतात.
टायरचा दाब नियमितपणे तपासा
तुम्ही टायरचा दाब नियमित तपासला पाहिजे, कारण असं केल्याने तुमच्या गाडीचं मायलेज तर वाढेलच, शिवाय टायर तुटणं किंवा टायर फुटणं यामुळं होणारं नुकसानही टाळता येईल. त्यामुळे तुम्ही जेव्हाही गाडीत पेट्रोल किंवा सीएनजी भरता, तेव्हा टायरची नियमित तपासणी नक्की करा.
इंजिन तेल आणि तेल फिल्टर वेळेवर बदला
इंजिन ऑइल, ऑइल फिल्टर आणि ब्रेक फ्युएलही गाडीच्या मायलेजमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात, कारण वंगणांशिवाय गाडीचं इंजिन व्यवस्थित काम करू शकत नाही. अशा परिस्थितीत काळजी घेतली नाही तर तुमच्या गाडीचं मायलेज कमी होतं. त्यामुळे तुमच्या गाडीचे इंजिन ऑइल, ब्रेक फ्युएल आणि ऑइल फिल्टर दर महिन्याला तपासून इंजिन ऑइल आणि ऑइल फिल्टर योग्य वेळी रिप्लेस करून घ्यावे. असं केल्याने भविष्यात गाडीवर होणारा मोठा खर्च टाळता येऊ शकतो.
बॅटरीची काळजी घ्या
गाडीचं बॅटरी लाइफ वाढवण्यासाठी तिच्या स्वच्छतेची काळजी घ्यायला हवी, कारण जास्त धूळ आणि घाणीमुळे बॅटरी करंट संपतो. त्यामुळे मऊ कापडाच्या साहाय्याने दर आठवड्याला बॅटरी पोस्ट किंवा टर्मिनल्स नियमितपणे स्वच्छ करायला हवेत. यासोबतच गरज नसताना गाडी चालू ठेवणं टाळायला हवं, कारण असं केल्याने बॅटरीचं आयुष्य कमी होतं.
विंडशील्ड बरोबर ठेवा
पावसाळ्यात गाडी चालवताना विंडशील्डची सर्वाधिक गरज भासते, कारण त्याच्या मदतीने ड्रायव्हरला पुढे जाण्याचा मार्ग नीट पाहता येतो. अशा परिस्थितीत सुरक्षेच्या दृष्टीने विंडशील्डही खूप महत्त्वाचे ठरते. त्यामुळे तुमच्या गाडीच्या विंडशील्ड खराब असतील किंवा त्यांना तडे गेले असतील तर तुम्ही ते ताबडतोब दुरुस्त करून घ्यावेत.
इंजिनची काळजी घ्या
कोणत्याही गाडीचे इंजिन हे त्याच्या हृदयासारखे असते. एखाद्या व्यक्तीने आपल्या हृदयाची काळजी घेणे जितके आवश्यक आहे तितकेच त्याची काळजी घेणे देखील महत्वाचे आहे. त्यामुळे आपल्या गाडीचं इंजिन स्वच्छ करण्याचीही विशेष काळजी घ्यायला हवी. गाडी बाहेरून स्वच्छ ठेवण्याबरोबरच तिचं इंजिनही नियमित स्वच्छ करायला हवं.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Car Maintenance Tips to good mileage check details here on 08 November 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER