3 May 2025 2:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Drone Taxi in India | ट्रॅफिक जॅमची कटकट | देशभरात ड्रोन टॅक्सी सुरू होणार | अधिक जाणून घ्या

Drone Taxi in India

Drone Taxi in India | तुम्हीही जर देशातील मोठ्या शहरांमध्ये राहत असाल आणि ऑफिसमध्ये जाण्यासाठी तुमच्या गाडीचा किंवा सार्वजनिक वाहनाचा वापर करत असाल, तर ट्रॅफिक जॅम ही तुमच्यासाठी नक्कीच समस्या असेल. देशात ड्रोन बनवणाऱ्या एका कंपनीने नुकतीच एक आनंदाची बातमी दिली आहे.

ऑक्टोबरपासून देशभरात ड्रोन टॅक्सी सुरू होतील :
ऑक्टोबरपासून देशभरात ड्रोन टॅक्सी सुरू होतील, असा दावा कंपनीने केला आहे. या ड्रोनमुळे टॅक्सीमध्ये चालकाव्यतिरिक्त फक्त एकच प्रवासी बसू शकणार आहे. ड्रोन टॅक्सीच्या सुविधेमुळे शहरादरम्यान हवेत उडून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे स्वप्न लवकरच साकार होऊ शकते.

दिल्ली-मुंबई अशा प्रमुख शहरांमध्ये ही सुविधा :
यंदा दिल्ली-मुंबईसह देशातील चार ते पाच प्रमुख शहरांमध्ये ही सुविधा सुरू करण्यात येणार असल्याचे ड्रोन टॅक्सी बनवणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या इंडिया ड्रोन फेस्टिव्हलमध्ये ड्रोन टॅक्सी आकर्षणाचे मुख्य केंद्र राहिले. ड्रोन टॅक्सीच्या प्रोटोटाइपवरून स्पष्ट दिसतंय की ड्रोन टॅक्सी रस्त्याऐवजी हवेत उडेल आणि प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी लवकर पोहोचवेल.

देशातील पाच शहरांमध्ये ड्रोन टॅक्सी सेवा :
ड्रोन टॅक्सी निर्मात्या कंपनीचे संस्थापक म्हणाले की, “यावर्षी ऑक्टोबरमध्ये देशातील पाच शहरांमध्ये ड्रोन टॅक्सी सेवा सुरू केली जाईल. सरकारने गेल्या वर्षी राष्ट्रीय ड्रोन धोरण जाहीर केले होते ज्यामध्ये भारतात प्रथमच ड्रोन टॅक्सींना मान्यता देण्यात आली होती.

देश रेड, यलो आणि ग्रीन झोनमध्ये विभागला गेला :
ड्रोन टॅक्सीसाठी संपूर्ण देश रेड, यलो आणि ग्रीन झोनमध्ये विभागला गेला आहे. ड्रोन टॅक्सींना रेड झोनमध्ये प्रवेश देण्यात आलेला नाही. ड्रोन टॅक्सी काही निर्बंधांसह पिवळ्या झोनमध्ये जाऊ शकतात.

ग्रीन झोनमध्ये ये-जा करण्यासाठी पूर्ण प्रवेश :
ड्रोन टॅक्सींना ग्रीन झोनमध्ये ये-जा करण्यासाठी पूर्ण प्रवेश असेल. राष्ट्रीय ड्रोन धोरणानुसार ड्रोन टॅक्सी हवेत 400 फूट उंचीवर उडू शकतात. ड्रोन टॅक्सींना कोणत्याही विमानतळाभोवती १२ किलोमीटरच्या परिघात उड्डाण करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

मेक इन इंडिया आय ड्रोन लॉन्च :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात ड्रोन फेस्टिव्हलचं उद्घाटन केलं होतं. यावेळी पंतप्रधान मोदींनी स्वत: ड्रोन उडवला होता. पंतप्रधान मोदींनी शेतीत ड्रोनचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांशीही चर्चा केली. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यावेळी म्हणाले की, भारताने मेक इन इंडिया आय ड्रोन लॉन्च केला असून त्याचा वापर लस वितरणात केला जाणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Drone Taxi in India will start soon check details 03 June 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Drone Taxi in India(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या