15 December 2024 7:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

MG Astor SUV Launched In India | बहुप्रतिक्षित भारतातली सर्वात स्वस्त SUV | MG Astor भारतात लाँच

MG Astor SUV Launched In India

मुंबई, 11 ऑक्टोबर | ब्रिटिश ऑटोमोबाइल कंपनी MG Motors ची बहुप्रतिक्षित मिड-साइज एसयूव्ही MG Astor अखेर आज भारतात लाँच झालीये. ही एमजीची भारतातली सर्वात स्वस्त एसयूव्ही (MG Astor SUV Launched In India) ठरली आहे. ह्युंडाई क्रेटा, किया सेल्टॉस, Skoda Kushaq आणि Volkswagen Taigun अशा सेगमेंटमधील दमदार एसयूव्हींना टक्कर देण्यासाठी एमजीने १० लाखांहून कमी किंमतीत आपली शानदार Astor भारतात उतरवलीये. या एसयूव्हीमध्ये सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच बघायला मिळतील अशा अनेक अॅडव्हान्स्ड फीचर्सचा समावेश कंपनीने केलाय.

MG Astor SUV Launched In India. MG Motor India today launched the Astor in the country at a starting price of Rs 9.78 lakh (ex-showroom, India). For the top-of-the-line variant, the MG Astor price goes up to Rs 16.78 lakh (ex-showroom, India) :

आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ऑटोनॉमस लेव्हल 2 ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम अशा फीचर्सनी सुसज्ज असलेली ही भारतातील पहिली ‘पर्सनल AI असिस्टंट SUV’ आहे, शिवाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) असलेली ही देशातील सर्वात स्वस्त कार आहे. तर पटकन बघूया या एसयूव्हीची किंमत किती, इंजिन डिटेल्स आणि कोणकोणत्या फीचर्समुळे ही ठरतेय ‘सुपर’ कार

२१ ऑक्टोबरपासून बुकिंग:
कंपनीने ही MG Astor एसयूव्ही एकूण चार ट्रिम्समध्येमध्ये आणली आहे. यात Style, Super, Smart आणि Sharp हे चार ट्रिम्सचे पर्याय आहेत. २१ ऑक्टोबरपासून Astor च्या बुकिंगसाठी सुरूवात होणार आहे. तर, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये डिलिव्हरीला सुरूवात होण्याची अपेक्षा आहे. ही कंपनीची भारतातली सर्वात स्वस्त एसयूव्ही असून लाइनअपमध्ये हेक्टरच्या खाली असणार आहे. पहिल्या बॅचमध्ये कंपनी Astor च्या एकूण ३००० युनिट्सची डिलिव्हरी करेल असं वृत्त आहे.

एमजीने Astor साठी, या सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच डिजिटल चावी आणली आहे. जर तुम्ही तुमच्या गाडीची चावी कुठे विसरलात किंवा तुमच्याकडून ती हरवली, तर तुम्ही डिजिटल की-फीचरच्या मदतीने गाडी सहज लॉक / अनलॉक किंवा स्टार्ट करू शकता. हे फीचर आय-स्मार्ट अ‍ॅपमध्ये उपलब्ध असून ते ब्लू-टुथच्या मदतीने ऑपरेट करता येते. जर एखाद्याने तुमचा स्मार्टफोन चोरला आणि तुमची एमजी अ‍ॅस्टर डिजिटल की-च्या मदतीने उघडण्याचा प्रयत्न केला तरीही काळजीचे काहीच कारण नाही. आपली कार लॉक केल्यानंतर फक्त डिजिटल की डिसेबल करून टाका. पुन्हा ती वापरण्याची वेळ येईल, त्यावेळी ती आधी तुम्हाला पासवर्ड विचारेल, कारण ती पासवर्ड-प्रोटेक्टेड आहे. सुरक्षेसाठी म्हणून आपला डिजिटल की पासवर्ड कुणाशी शेअर करू नका, विशेषतः आपला फोन हरवलेला असताना.

The MG Astor is available in four variants:
Style, Super, Smart, and Sharp. Below are the variant-wise introductory MG Astor prices (ex-showroom, India) :

MG-Astor-SUV-Launched-In-India

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: MG Astor SUV Launched In India today starting price of 9 lakhs 78 thousand ex showroom.

हॅशटॅग्स

#Auto(76)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x