30 April 2025 9:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस, 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स देणार ही कंपनी, सुवर्ण संधी सोडू नका SBI Mutual Fund | श्रीमंत करणारी SBI फंडाची योजना, महिना 5,000 रुपये SIP वर मिळेल 2 कोटी 56 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | तुमच्या कुटुंबात सरकारी आहेत का? फिटमेंट फॅक्टर + DA मर्जर; पगारात किती वाढ होईल पहा Home Loan EMI | ईएमआय वर 77 लाखांचं घर घ्यावं की SIP करावी? तुमचा अधिक फायदा कुठे आहे समजून घ्या EPFO Pension Money | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांनो, अन्यथा तुम्हालाही महिना कमी पेन्शन घ्यावी लागेल, ही अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 30 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट; डाऊनसाइड टार्गेट प्राईस अलर्ट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा? - NSE: IRB
x

TATA Punch EV | धमाका ऑफर, 19,500 रुपयांच्या मासिक EMI वर घरी घेऊन या 'टाटा पंच EV, संधी सोडू नका

TATA Punch EV

TATA Punch EV | भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक वाहन खरेदी करणाऱ्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. बऱ्याच व्यक्ती जास्त पैसे देऊन इलेक्ट्रॉनिक वाहन खरेदी करण्याकडे जोर दाखवत आहेत. वाढते प्रदूषण लक्षात घेता इलेक्ट्रॉनिक वाहने चालवणे अनेकांना फायद्याचे वाटत आहे. अशातच टाटा पंच इव्हीने आपल्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आणली आहे.

टाटा पंच इव्हीची किंमत :
टाटाचा या इलेक्ट्रॉनिक कारची एक्स शोरूम किंमत 9.99 लाख रुपये आहे. अशातच ही कार ऑन रोड किंमतीत 10.37 लाखांमध्ये येते. हे 39 हजार रुपयांचे इतर शुल्क समाविष्ट असतात तर त्याचबरोबर 38000 रुपयांचा विमा खर्च देखील शामिल असतो. टाटाची ही कार ग्राहकांना चांगलीच भावली आहे. कारचे मॉडेल आणि फीचर्स पाहून अनेकजण भारावून गेले आहेत. दरम्यान तुम्हाला ही कार एक लाख रुपयांचे डाऊन पेमेंट करून देखील खरेदी करता येणार आहे. एक लाख रुपये डाऊन पेमेंट केल्यानंतर उर्वरित रक्कम तुम्ही कर्जाद्वारे देखील भरू शकणार आहात.

कर्ज प्लॅन :
1. टाटाची जबरदस्त मॉडेल असलेली कार खरेदी करण्यासाठी तुम्ही एक लाख रुपयांचे डाऊन पेमेंट करून उर्वरित रक्कम कर्ज घेऊन फेडणार असाल आणि 5 वर्षांसाठी कर्ज घेतलं तर, तुम्हाला 9% व्याजदराने कर्ज फेडावे लागेल. यामध्ये तुम्हाला मासिक ईएमआय हप्ता 19,500 रुपयांचा बसेल.

2. तुम्ही कर्ज फेडण्याचा प्लॅन 4 वर्षांचा घेत असाल तर, 9% व्याजदरानुसार तुम्हाला प्रत्येक महिन्याला 23,000 रुपयांचा मासिक ईएमआय हप्ता भरावा लागेल.

टाटा पंच इव्ही देते टॉप सुरक्षा :
टाटाच्या या जबरदस्त कारला Bharat NCAP कडून 5 स्टार रेटिंग मिळाले आहेत. कारमध्ये 360 डिग्री कॅमेरा असून 6 एअरबॅग, ESC म्हणजेच इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण, ऑटो होल्ड, पार्किंग ब्रेक यांसारख्या उत्कृष्ट सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहकांना टाटा पंच इव्ही कार प्रचंड भावली आहे.

टाटा पंच इव्हीचे प्रीमियम वैशिष्ट्ये :
टाटा पंच इव्हीमध्ये ॲपल कारप्ले, अँड्रॉइड ऑटो सपोर्ट, ड्युअल-टोन अपहोल्स्ट्री, 7-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, वायरलेस चार्जर, एअर प्युरिफायर त्याचबरोबर AQI डिस्प्ले आणि 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम एवढे प्रीमियम वैशिष्ट्ये टाटा पंच इव्हीमध्ये बसवण्यात आले आहेत.

Latest Marathi News | TATA Punch EV Wednesday 05 February 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Tata Punch EV(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या