माझा ब्लॉग
-
बुद्धिबळचा पट आता ऑनलाईन !
बुद्धिबळ म्हंटले कि शंभरातील नव्वद मुलं लांबच राहतात. “हा खेळ फक्त हुशार मुलंच खेळतात..” “फार डोकं लागतं बाबा..” “आपलं काम नाही ते..”, अशी अनेक मतं मांडली जातात. पण गेल्या काही वर्षात बुद्धिबळाबद्दल अशी मतं असलेल्या मुलांची या खेळाशी चांगलीच मैत्री झाली आहे. त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तंत्रन्यान. बुद्धिबळ खेळण्यासाठी विविध वेबसाइट आणि एप्स उपलब्ध असल्यामुळे या खेळाने अनेकांना आकर्षित केले आहे. `
5 महिन्यांपूर्वी -
बुद्धिबळ एक विस्मयकारक खेळ!
बुद्धिबळ हा खेळ आजपासून १५०० वर्षांपूर्वी शोधला गेला असा उल्लेख बऱ्याच पुस्तकातून केलेला आढळतो. बुद्धिबळ या खेळाची सुरवात भारतातच झाली. मी वाचलेल्या अनेक पुस्तकात बुद्धिबळाचा शोध कसा लागला यावर विविध तर्क वितर्क केले आहेत. असे मानले जाते कि उत्तर भारतात या खेळाची सुरवात झाली. जेव्हा तेथील स्थानिक राजा लढाईवर जात असे तेव्हा त्याची राणी त्याला एका पाटावर लढाई कशी लढावी याची व्यूहरचना करून देत असे. त्यातूनच मग पुढे याने खेळाचे रूप घेतले.
7 महिन्यांपूर्वी -
BLOG - खेळ जातींचा...
एकदा माणसाचा जन्म घेतला कि पुन्हा मनुष्यरुपात जन्माला यायला ८४ लक्षयोनीतून जावं लागत असं म्हटलं जातं. ‘माणूस हा सगळ्यात बुद्धिमान प्राणी’, ‘ह्युमन इस द मोस्ट ब्युटीफुल क्रिएशन ऑफ नेचर’ ही आणि अशी अनेक वाक्य आपण मनुष्य रुपात जन्माला आल्या नंतर ऐकतो. सुरुवातीच्या काळात, शाळेत असताना किंवा इतर वेळीही ही वाक्य ऐकली कि काय आपलं भाग्य महान कि आपण मानव म्हणून जन्माला आलो असं वाटणं हे सहाजिकच आहे.. पण जसं जगाचा अनुभव घ्यायचं क्षेत्र वाढत गेलं तसं माणसानेच स्वतःच्या फायद्यासाठी निर्माण केलेल्या काही गोष्टी कळायला लागल्या, त्यांचा द्वेष वाटू लागतो..
2 वर्षांपूर्वी -
BLOG : खरंच जगणे कठीण आहे ?
राम तसा दहावीला खूप हुशार होता, बोर्डात आला होता. घरची कामं करत करत रामने हा पराक्रम केला होता. घरची परिस्थिती बेताचीच आईवडील शेतमजुरी करायचे. पुढे रामने परिस्थिती पाहून शिक्षणाला रामराम ठोकायचा निर्णय घेतला आणि एका सावकाराच्या दुकानात कामाला लागला. रामचे आईवडील व नातेवाईक समाधानी झाले चला मुलगा कमवता झाला. सावकारही रामला कवडीमोल देऊन त्याच्याकडून भरपूर कामं करवून घ्यायचा. कालांतराने रामला हेच रोजचे रटाळ थोड्याफार पैश्यांसाठी लोकांसाठी जगणे चांगले वाटू लागले. त्याच्यातील कल्पकता संपुष्टात येत होती, नवीन काहीतरी शिकण्याची जिज्ञासा लोप पावत होती. स्वतंत्र जीवन जगण्याच्या इच्छाशक्तीचा ऱ्हास होत होता. जगण्यातील स्वाभिमानाला तर मरगळ अली होती. राम सावकाराच्या कवडीमोल पैश्याच्या, आईवडिलांच्या अपेक्षांच्या ओझ्याच्या आणि समाजातील थोतांड, दिखाऊ आणि अनावश्यक प्रतिष्ठेच्या भयानक व बाहेर निघण्यासाठी दार नसलेल्या चौकटीत अडकला होता तरी त्याला त्याच्यातच आनंद मानून रोज सावकाराच्या दुकानात जावं लागत असे.
2 वर्षांपूर्वी -
बालपण वाचवण्यासाठी!
बालपण म्हटलं की बर्याच अविस्मरणीय गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात. परंतु ज्या मुलांचे लहानपणी लैंगिक शोषण झाले आहे, त्यांना बालपणीच्या आठवणी नकोश्या वाटतात. त्याचा परिणाम त्यांच्या मनावर फार खोलवर झालेला असतो. काही लोकांची धारणा आहे की विभक्त कुटुंबामुळे आई वडील कामावर जात असल्यामुळे, मुलांकडे लक्ष द्यायला कोणी नसल्यामुळे अशा घटना घडतात. विभक्त कुटुंबामुळेच शोषण करण्यास संधी मिळते, तसं काहीच नाही. एकत्रित कुटुंबात देखील अश्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. पण सामाजिक दबावामुळे त्या दाबल्या जातात व त्यांच्या उल्लेख ही होत नाही. यात शोषण करणारा हा नेहमी जवळचा व्यक्ती असतो.
2 वर्षांपूर्वी -
युवकांनो देश वाचवा!
आगामी काळात भारत देश हा जगातील सर्वात जास्त तरुण देश म्हणून ओळखला जाणार आहे. याची जाणीव ठेवून भारतातील सर्व तरुण तरुणींना देशाच्या आगामी जडणघडणीत मोलाचा वाटा उचलावा लागणार आहे. प्रशासन, उद्योग, वैदकीय क्षेत्र, विज्ञान, विधी, कला, संस्कृती, क्रीडा, तंत्रज्ञान आणि कृषी क्षेत्रात आपापले अनमोल आणि सर्वोकृष्ट योगदान देऊन देशाला महासत्ता बनवण्यासाठी देशातील प्रत्येक तरुण बांधील आहेत. भारतीय युवक युवतींनी अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामं केली आहेत, करत आहेत आणि यापुढेही करतील पण भारतीय तरुण समाजकारण आणि राजकारणाकडे (लोकशाहीकडे) फारसे लक्ष देत नाहीत याचे दुष्परिम आपण मागच्या दीड-दोन दशकपासुन पाहत आलो आहोत आणि भविष्यात तर आपल्याला आशा मोठमोठ्या दुष्परिणाला सामोरे जावे लागणार आहे. म्हणून भारतीय तरुणाईने, लूळी-पांगळी होत चाललेल्या लोकशाही चे रक्षण आणि संवर्धनासाठी पुढाकार घेतला पाहिजे. समाजकरणासोबतच राजकारणात अर्थात लोकशाहीत प्रामाणिकपणे जास्तीत जास्त सहभाग नोंदवला पाहिजे.
2 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणाची गरज - राहुल शिंदे
सध्या सर्वत्र मराठा आरक्षणाचा विषय अगदी जोरात चर्चेचा आहे त्यावर विविध माध्यमातून विविध मुद्दे समोर येत आहेत आणी ते वाचून-पाहुन माझ अस स्पष्ट मत झालय की कुणीही याविषयी वास्तविक मत मांडायला तयार नाही, सगळीकडुनच केवळ संभ्रम निर्माण केला जातोय.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
शेतकऱ्यांना घरी जाऊदे | मग कमिटीचा अहवाल ग्रीन सिग्नल देईल | मग सर्व मेहनत वाया
-
अॅमेझॉन अॅकॅडमी | E-learning Entry | JEE ते स्पर्धा परीक्षांची ऑनलाईन तयारी
-
मराठा आरक्षण | खासदारांचं शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार | पवार, अशोक चव्हाणांची बैठक
-
मुंबईत कोस्टल रोडच्या निर्मितीचं काम वेगाने सुरू | प्रवासही नयनरम्य होणार
-
आता तरी शेतकऱ्यांचे हित पाहावे | पवारांचा मोदी सरकारला टोला
-
कृषी कायदा | सुप्रीम कोर्टाकडून समिती गठीत | कोण आहेत या समितीत
-
टेस्लाची R&D सेंटरसाठी कर्नाटकला पसंती | नियोजित प्लांट महाराष्ट्रात उभारण्याबाबत सकारात्मक
-
सोशल मीडिया | भाजपचे अपप्रचार तंत्र | काँग्रेसकडून सोशल मीडिया वॉरियर्स टीमची स्थापना
-
मराठा आरक्षण | अशोक चव्हाण यांच्यानंतर आशिष शेलार पवारांच्या भेटीला
-
माझं वाक्य लक्षात ठेवा | कृषी कायदे रद्द करण्यास सरकारला भाग पाडू - राहुल गांधी