तो भारताविरोधात असणाऱ्या चीन, तुर्कीचा लाडका | संघाचं आमिर खानवर टीकास्त्र
नागपूर, 26 ऑगस्ट : नुकताच तुर्कीचे राष्ट्रपती रजब तैयब एर्दोगन यांची पत्नी एमी एर्दोगान यांनी अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) भेट घेतल्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) आमिरवर निशाणा साधला आहे. आमिर हा चीनमधील (China) सत्ताधारी पक्षाचा लाडका असल्याचा टोला संघाने आपल्या ‘पांचजन्य’ मुखपत्रामधून लगावला आहे. तसेच भारताविरोधात असणाऱ्या देशांबद्दल आमिरच्या भूमिकेसंदर्भात प्रश्न या लेखामध्ये उपस्थित करण्यात आले आहे.
तुर्की (Turkey) राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीला भेट देऊन आणि चिनी उत्पादनांना प्रोत्साहन देण्याच्या बाबतीत, बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानला लक्ष्य केले आहे. ‘ड्रॅगन का प्यार खान’ या मथळ्याखाली छापून आलेल्या लेखामधून आमिरच्या भूमिकेवर टीका करण्यात आली आहे. स्वातंत्र्याच्या आधी आणि त्यानंतरही देशभक्ती या विषयावर चित्रपट निर्माण झाले. मात्र नंतर चित्रपटांना पाश्चिमात्य संस्कृतीची हवा लागली आणि नेतृत्व करणारा चित्रपट संपला. मागील पाच ते सहा वर्षांमध्ये पुन्हा एकदा देशभक्तीवर आधारित चित्रपटांची संख्या वाढलेली दिसते. मात्र दुसरीकडे असे काही अभिनेते आणि चित्रपट निर्माते आहेत ज्यांना आपल्या देशाबरोबर वैर असणारे चीन आणि तुर्कीसारखे देश जास्त आवडतात, अशा शब्दांमध्ये आमिरवर निशाणा साधण्यात आला आहे.
मुस्लिमांच्या उम्मांचा (माता) दूत बनण्यासाठी उत्सुक असणाऱ्या तुर्कीच्या राष्ट्रापतींची पत्नी आणि आमिर खान यांची नुकतीच भेट झाली आणि या भेटीचे फोटो समोर आले आहेत, असा उल्लेख लेखामध्ये करण्यात आला आहे. चीनमध्ये एकीकडे इतर कलाकार आणि निर्माते अपयशी ठरत असतानाच आमिर खानचे चित्रपट भरपूर कमाई करताना दिसतात. आमिर खान चिनी व्हिवो मोबाइल कंपनीचा ब्रॅण्ड अँबेसिडर आहे. ही कंपनी नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसून आलं आहे, असा उल्लेख लेखामध्ये आहे.
भारतामध्ये एखाद्या अभिनेत्याला लोकं डोक्यावर घेऊन नाचतात आणि यशाच्या शिखरावर पोहचवतात तेव्हा त्याचा धर्म पाहिला जात नाही. त्याच्या चित्रपटांवर लोकं खूप पैसे उधळतात. लोक त्याच्या धर्माची नाही तर त्याच्यातील कलाकाराचे कौतुक करतात, असंही या लेखामध्ये म्हटलं आहे. मात्र जेव्हा अशी व्यक्ती देशातील लोकांना ठेंगा दाखवून त्यांच्या प्रेमाच्या मोबदल्यात ‘आधी धर्म नंतर देश’सारखी जिहादी विचारसरणी दाखवू लागते किंवा थोड्या पैशांसाठी शत्रू देशाच्या इशाऱ्यावर नाचू लागते तेव्हा चीड येते. अशी व्यक्ती शत्रू राष्ट्रातील पाहुणचार निर्ल्जमपणे कबुल करु लागली तर देशातील लोकांनी त्यांची फसवणूक झाली आहे असं समजावं का?, आजकाल चीन आणि तुर्कीचा लाडका ठरत असलेल्या आमिर खानच्या याच सर्व गोष्टींचा त्याच्या चाहत्यांना आणि सामान्य देशभक्तांना राग येत आहे, असंही लेखात म्हटलं आहे.
News English Summary: Days after actor Aamir Khan met Turkish First Lady Emine Erdogan, RSS mouthpiece Panchjanya has accused him of colluding with anti-India forces, with specific reference to China and Turkey.
News English Title: RSS Mouthpiece Slams Bollywood superstar Aamir Khan Accuses Dragons Favourite Of Colluding Against India News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- IREDA Share Price | IREDA शेअर ना ओव्हरबॉट ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत - SGX Nifty
- Government Job | महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात 219 रिक्त पदांसाठी भरती, पगार 1,42,400 रुपये
- Smart Investment | कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याआधी 'या' गोष्टींची पुरेपूर काळजी घ्या, अन्यथा तोटा होईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC