18 February 2025 4:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | खुशखबर, आता महिना अवघ्या 250 रुपयात म्युच्युअल फंडातून पैसा वाढवा, SBI जन-निवेश SIP योजना लाँच EPFO Pension Money | खाजगी कंपनी पगारदारांना महिना 7500 रुपये ईपीएफ पेन्शन मिळणार, अपडेट जाणून घ्या BEL Share Price | डिफेन्स शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून मोठे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: RELIANCE GTL Share Price | 1 शेअरवर 5 फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, जीटीएल कंपनी पेनी स्टॉक फोकसमध्ये Horoscope Today | मंगळवार 18 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा मंगळवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध राशी परिवर्तन, 22 फेब्रुवारीपासून या 3 राशींसाठी चांगला काळ सुरु होणार, तुमची राशी आहे का?
x

CBI टीम पुन्हा सुशांतच्या घरी पोहोचली | इमारतीतील रहिवाशांची चौकशी होणार

SSR case, CBI, Sushant Singh Rajput, Marathi News ABP Maza

मुंबई, ५ सप्टेंबर : बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या घरी पुन्हा एकदा सीबीआयची टीम दाखल झाली आहे. शनिवारी सकाळी 11 च्या सुमारास सीबीआयची दोन पथकं वांद्रे येथील कार्टर रोड येथील माऊंट ब्लॅक या इमारतीतील सुशांतच्या घरात पोहोचली आहेत.

सीबीआयनं दिलेल्या माहितीनुसार, सुशांत राहात होता त्या इमारतीतील रहिवाशांची चौकशी होणार आहे. तसेच सुशांतच्या आत्महत्येचे पुन्हा एकदा नाट्य रुपांतर केलं जाईल, असंही सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

सुशांतच्या घरी सीबीआयच्या टीम तिसऱ्यांदा दाखल झाल्या आहेत. या आधी दोन वेळा सीबीआयच्या टीम सुशांतच्या घरी आल्या होत्या. त्यावेळी सुशांतच्या इमारतीतील सर्व सीसीटीव्ही कॅमेरा कनेक्शनची तपासणी करण्यात आली होती. तसेच सुशांतच्या बेडरुममध्ये त्याच्या आत्महत्येचं नाट्य रुपांतरही करण्यात आलं होतं.

दुसरीकडे, अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक आणि सॅम्युअल मिरांडा या दोघांना अंमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) शुक्रवारी रात्री अटक केली. अटकेच्या या कारवाईनंतर सुशांतच्या कुटुंबीयांचे वकिल विकास सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“एनसीबीने अटकेची कारवाई केली. त्यातून मुंबई पोलीस मोठं काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतायत, ही कुटुंबीयांना वाटणारी भीती बरोबर होती, हे सिद्ध झाले आहे. या प्रकरणात वेगवेगळे अँगल आहेत. वेगवेगळया अंगाने तपास होऊन, आणखी माहिती समोर येईल अशी सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबीयांना अपेक्षा आहे” असे विकास सिंह म्हणाले.

 

News English Summary: Meanwhile, the CBI here has been trying to recreate the crime scene at the late actor’s residence in Bandra. According to Times Now, the CBI has reached Sushant’s residence along with doctors from AIIMS, Sushant’s sister, house helps Neeraj and Keshav and the actor’s flatmate Siddharth Pithani.

News English Title: SSR case CBI team reached Sushant Singh Rajput house for the third time officials made a big revelation Marathi News LIVE latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x