 
						Business Idea | सध्याची तरुण पिढी नोकरी करण्यापेक्षा आपला स्वतःचा हक्काचा बिजनेस केलेला केव्हाही चांगला असा विचार करणारी आहेत. कारण की, कार्पोरेट विश्वात दुसऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे काम करण्यापेक्षा आपल्याच बिझनेसमध्ये आपणच मालक आणि आपणच नोकर बनलो तर, किती बरं होईल. तुमच्या डोक्यात सुद्धा बिझनेसचा किडा घुसला आहे का. जर उत्तर होय आहे तर, या 3 भन्नाट बिजनेस आयडिया खास तुमच्यासाठी. आज आम्ही ज्या बिझनेस आयडिया सांगणार आहोत त्या वर्षाच्या 12 ही महिने तुफान चालणाऱ्या आहेत. त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची काहीही गरज नाही.
1. पॉपकॉर्न बनवण्याचा बिझनेस :
पॉपकॉर्न हा प्रत्येकाच्या आवडीचा पदार्थ आहे. स्नॅक फूड म्हणून बरेच पालक आपल्या लहान मुलांना देखील पॉपकॉर्न खायला देतात. एवढेच नाही तर, थिएटरमध्ये देखील चित्रपट पाहताना पॉपकॉर्न खाण्याची मजाच काही न्यारी असते. तुम्ही पॉपकॉर्न विकून देखील लाखोंची कमाई करू शकता. यासाठी तुम्हाला मके आणि पॉपकॉर्न बनवण्याची मशीन विकत घ्यावी लागेल. या बिझनेसची आणखीन एक खास गोष्ट म्हणजे तुम्हाला जास्त मशिनरी खरेदी करावी लागणार नाही. कमी पैशांत आणि तुमच्या कामाच्या वेळेनुसार तुम्ही हा बिझनेस आनंदात करू शकता.
2. सलून किंवा पार्लर बिजनेस :
सध्या मार्केटमध्ये ठीक ठिकाणी मोठमोठे सलून आणि ब्युटी पार्लर उघडले आहेत. महिलांसाठी त्यांच्या त्वचेची तसेच केसांची आणि संपूर्ण शरीराची स्वच्छता आणि काळजी घेण्यासाठी पार्लर सज्ज आहेत. सलोनच्या बाबतीत पुरुष देखील मागे हटले नाही आहेत. महिलांप्रमाणे पुरुष देखील सलोनमध्ये जाऊन वेगवेगळ्या ट्रीटमेंट घेत असतात.
3. किराणा दुकान बीजनेस :
किराणा दुकानाचा बीजनेस सुध्दा चांगला जोरदार चालु शकतो. किराणा दुकानात आपल्या दररोजच्या जीवनात वापरात असणाऱ्या गोष्टी ठेवू शकतो. केवळ या बिझनेससाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंटकरिता पैसे लागू शकतात.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		