2 May 2025 8:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Business Idea | महिलांनो घरबसल्या लाखांच्या घरात पैसे कमवायचे आहेत मग, हे 4 व्यवसाय सुरू करा, तुमचं नशीब उजळेल

Business Idea

Business Idea | कमीत कमी भांडवला तर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा प्रत्येक व्यक्तीची असते. दररोजच्या नोकरीपासून सुटका मिळवून तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. आज आम्ही तुम्हाला काही भन्नाट व्यवसायांच्या कल्पना सांगणार आहोत. हे व्यवसाय तुम्ही 50 ते 1 लाखांचा भांडवलात सुरू करू शकता. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही लाखोंच्या घरात या व्यवसायांत बंपर परतावा मिळवू शकता. चला तर जाणून घेऊया हे गुंतवणुकीचे पर्याय नेमके कोणते आहेत.

दुधाचा व्यवसाय :
शहरी भागांमध्ये राहणाऱ्या बहुतांश व्यक्तींच्या घरी गाय किंवा म्हैस असते. तुमच्याजवळ गाय किंवा म्हैस नसेल तर, तुम्ही बाजारात 30,000 रुपयांना खरेदी करू शकता. तुमच्याजवळ आधीच गाय किंवा म्हैस असेल तर, तुम्ही अगदी आरामात 50,000 रुपयांमध्ये दुधाचा व्यवसाय सुरू करू शकता. दुधापासून तुम्ही वेगवेगळे पदार्थ देखील बनवू शकता. यामध्ये दही, लस्सी, आईस्क्रीम, पनीर, वेगवेगळ्या मिठाई यांसारखे बरेच पदार्थ तयार करता येऊ शकतात. दुधाच्या व्यवसायातून तुम्हाला महिन्याला बक्कळ पैसे मिळू शकतात.

मधाचा व्यवसाय :
तुमच्याजवळ जास्तीत जास्त भांडवल म्हणजेच 1 ते 2 लाख रुपयांपर्यंत रक्कम असेल तर, तुम्ही मधाचा व्यवसाय देखील सुरू करू शकता. सध्या बाजारात वेगवेगळ्या ब्रँडचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे मध उपलब्ध आहेत. परंतु बहुतांश व्यक्तींना शुद्ध मध खाण्याची सवय असते. त्यामुळे तुमच्या मधाची गुणवत्ता उत्तम असेल तर तुम्ही मधमाशा पाळून मधाचा व्यवसाय सुरू करू शकता आणि आपल्या ग्राहका उत्तम दर्जाचे मध विकू शकता.

वृक्ष लागवडीतून देखील कमावता येतात भरपूर पैसे :
वृक्ष लागवड करण्यासाठी तुमच्याजवळ चांगली जमीन असेल तर, तुम्ही शिशम आणि सागवन यांसारखी झाडे लावू शकता. तुम्ही शिशम आणि सागवनचे रोपटे जमिनीमध्ये लावून 8 ते 10 वर्षानंतर लाखोंच्या घरात पैसे कमावू शकता. शीशम झाडाची किंमत सध्या बाजारात 40,000 रुपयांना आहे. तर, सागवानाचे झाड त्याहून जास्त किंमतींना विकले जाते. अशा पद्धतीने तुमचा व्यवसाय तुफान चालेल.

फुलांचा व्यवसाय :
चांगली रक्कम मिळवण्यासाठी तुम्ही कमीत कमी भांडवला तर फुलांचा व्यवसाय देखील सुरू करू शकता. सध्या बर्थडे पार्टी किंवा बेबी शॉवर यांसारख्या कार्यक्रमांमध्ये फुलांच्या डेकोरेशनला प्रचंड मागणी आहे. एवढेच नाही तर 90% व्यक्ती देवपूजा करण्यासाठी दररोज सकाळी ताजी फुलं घरी घेऊन जातात. त्यामुळे फुलांचा व्यवसाय हा दररोज सांगली कमाई मिळवून देणारा आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Business Idea(92)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या