1 May 2025 2:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

Business Idea | घरबसल्या होईल लाखोंची कमाई, या व्यवसायातून महिन्याला कमवाल हजारो रुपये, इथे जाणून घ्या योग्य माहिती

Business Idea

Business Idea | प्रत्येक व्यक्तीला व्यवसाय करण्याची इच्छा असते. आपला घरातून का होईना पण साईड बाय साईड व्यवसाय असावा. ज्या व्यवसायातून आपले महिन्याचे थोडेफार पैसे सुटतील. नोकरीच्या कमी पगारात घर चालवणे शक्य होत नाही. अशावेळी व्यक्ती धडपड करून चांगल्या पगाराची नोकरी देखील शोधतो. तरीही आपल्या गरजा दिवसेंदिवस वाढत जातात. गरजा भागवण्यासाठी तुमच्याजवळ इनकमचे वेगवेगळे सोर्स असणे अत्यंत गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला एक तुफान चालणारा व्यवसाय सांगणार आहोत. ज्याच्या माध्यमातून तुम्ही हजारो रुपयांची कमाई करू शकाल.

तयार करा तुमचा ब्रँडेड साबण :
सध्या मार्केटमध्ये बऱ्याच लघुउद्योजिका आपले प्रॉडक्ट ब्रँडेड कसे होईल आणि जास्तीत जास्त कसे चालेल याकडे लक्ष देत आहेत. ग्राहक कधीपण इतरांपेक्षा तुमच्या प्रॉडक्टमध्ये नेमके काय वेगळेपण आहे हे तपासूनच खरेदी करतो आणि म्हणूनच आज आम्ही तुम्हाला साबण बनवण्याच्या सर्व गोष्टीची माहिती सांगणार आहोत.

प्रत्येक व्यक्तीची सकाळची सुरुवात होते ती म्हणजे साबणाने. स्वच्छ आणि सुगंधित साबणाने अंघोळ केल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटते. आपला दिवस तरोताजा होऊन आपली त्वचा चकाकते. तुम्ही देखील आयुर्वेदिक पद्धतीने घरबसल्या साबण बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता.

साबण बनवण्याच्या व्यवसायाला कोणकोणते साहित्य लागेल :
1. साबण बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला साबण बनवण्याचे पात्र म्हणजेच सिलिकॉन बेसचे साचे लागतील. ज्या साच्यांमध्ये तुम्ही साबणाचे लिक्विड ओतून सेट करून साबण तयार करू शकाल.

2. त्यानंतर youtube वर त्याचबरोबर तुम्ही तुमच्या पद्धतीने एक्सपेरिमेंट करून साबणाची एक होम रिमेडी तयार करू शकता. तुमची हो मेरी मेडी लिक्विड फर्ममध्ये असणे गरजेचे आहे. त्यानंतर तुम्हाला बाजारातून किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून पांढऱ्या रंगाचा कच्चा साबण ऑर्डर करायचा आहे.

3. तुम्ही बनवलेली होम रिमेडी कच्चा साबणामध्ये विरघळून घ्यायची आहे. हे सर्व करण्यासाठी तुम्हाला गॅसचा वापर करावा लागेल. त्यानंतर लगेचच तुम्हाला साच्यामध्ये साबण सेट करण्यास ठेवायचे आहेत.

कोणकोणत्या पद्धतीचे साबण बनवू शकता :
बऱ्याच महिलांना टॅनिंगचा प्रॉब्लेम असतो. मानेवर, हातांवर, पायांच्या ढोपरांवर काळे चट्टे आणि डाग पडलेले असतात. अशावेळी तुम्ही तुमच्या साबणामध्ये केसर, संत्र्याच्या सालीची सुकी पावडर, कोरफड, तांदळापासून बनवले जाणारे साबण, कॉफी, कडुलिंब आणि हळदीच्या लेपापासून बनलेला साबण. यांसारख्या विविध पद्धतींचे आयुर्वेदिक साबण तयार करून तुम्ही वापरू शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Business Idea(92)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या