26 March 2025 5:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 27 मार्च 2025; तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल, गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 27 मार्च रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांनो, UPI आणि ATM वापरून 1 मिनिटात EPF खात्यातून 1 लाख रुपये काढता येणार Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या दरात मजबूत वाढ झाली, लग्नाच्या सीझनमध्ये तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, ताड तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: IREDA TATA Motors Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने दिला खरेदीचा सल्ला, BUY रेटिंग सह टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS GTL Infra Share Price | 52 आठवड्यांच्या नीचांकाजवळ जीटीएल इन्फ्रा शेअर, महत्वाची अपडेट आली - NSE: GTLINFRA
x

Business Idea | 'या' गोष्टीतून पैसे कमवायला शिकला तर, कधीही उपाशी राहण्याची वेळ येणार नाही, भन्नाट बिझनेस आयडिया पहा

Business Idea

Best Business Idea | बऱ्याच व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा असते. आपण आपला एखादा साईट बिजनेस सुरू करून भरपूर पैसे कमवावे असा स्वप्न अनेकांचं असतं. आज आम्ही तुम्हाला काही भन्नाट बिजनेस आयडिया सांगणार आहोत. यांच्या मदतीतून तुम्ही महिन्याला 50 ते 75,000 रुपयांची कमाई करू शकता. चला तर मग जाणून घेऊया बिझनेस आयडिया.

कोणत्याही प्रकारचा व्यवसाय सुरू करण्याआधी तुम्हाला 50 ते 1 लाख रुपयांची गुंतवणूक करावीच लागेल. या हेतून कमी भांडवलात कोण कोणते व्यवसाय करता येईल हे जाणून घेऊया.

दूध विक्री :
तुमच्याजवळ म्हैस किंवा गाय असेल तर तुम्ही दूध विक्रीचा व्यवसाय सुरू करू शकता. तसं पाहायला गेलं तर बहुतांश घरात दररोज दुधाच्या एक कप चहाने दिवसाची सुरुवात होते. प्रत्येक व्यक्ती चुस्की मारत चहा पितात किंवा लहान मुलांना दररोज दूध प्यायला लागते. या हिशोबाने तुम्ही दररोज चालणारा दूध विक्रीचा व्यवसाय करून महिन्याला 50,000 किंवा त्याहून अधिक रक्कम कमावू शकता.

फुलांचा व्यवसाय :
सध्याच्या घडीला लग्नसराई असो किंवा डोहाळे जेवण असो. त्याचबरोबर बाळाच्या बारशासाठी देखील लोक सजावटीकरिता बाजारातून फुल विकत आणतात. रंगीबिरंगी फुलांनी बाळाचा पाळणा किंवा घराला सजावट करण्यात येते. रंगीबिरंगी आकर्षित फुलांमुळे मन देखील प्रसन्न राहते. त्यामुळे तुम्ही फुलांचा व्यवसाय देखील सुरू करू शकता. हा व्यवसाय दररोज चालणारा आहे. बऱ्याच व्यक्ती देवाला वाहण्यासाठी देखील दररोज फुलं किंवा फुलांचा तयार हार विकत घेतात. त्यामुळे तुम्ही हा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता.

शुद्ध मध विक्री :
सध्या बाजारात विविध प्रकारचे आणि विविध ब्रँडचे मध उपलब्ध आहे. शुद्ध मध केवळ गावाकडे आणि कमी प्रमाणात पाहायला मिळते. तुम्ही 1 लाख रुपयांची रक्कम गुंतवून मधमाशी पाळण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. यासाठी तुम्हाला योग्य प्रशिक्षण घ्यावे लागेल. त्याचबरोबर तुमचं शुद्ध मध बाजार मूल्यापेक्षा काही रुपये अधिक विकल्याने केवळ मध शुद्ध आहे या कारणामुळे तुमच्याकडे ग्राहकांची गर्दी होईल.

झाडे लावा, झाडे विका :
तुम्ही झाडे लावून देखील बक्कळ पैशांची कमाई करू शकता. बाजारात शिशम आणि सागवान झाडांच्या किंमती 50,000 रुपयांच्या पुढे पाहायला मिळतात. तुमच्याजवळ चांगली जमीन असेल आणि जमिनीचा पोत देखील चांगला असेल तर, शीशम आणि सागवानची झाडे लावून तुम्ही भरपूर कमाई करू शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Business Idea Tuesday 28 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Business Idea(92)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या