
IRCTC Login | रेल्वेने प्रवास करताना आपण ट्रेनचे टिकीट बुक करतो. अशात अनेकदा प्रवाशांचे निर्णय बदलतात आणि ज्या स्थानकातून त्यांना ट्रेन पकडायची आहे तेथून ते ट्रेन पकडत नाहीत. भारतात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेकदा आपले बोर्डिंग स्टेशन बदलावे लागते. आता असे तुमच्याबरोबर झाल्यावर टेन्शन घेण्याची गरज नाही.
कारण भारतीय रेल आपल्याला ही सुविधा देत आहे. तुम्ही 24 तास आधी तिकीट बुक केले असेल तर त्याचे बुकिंग बदलता येणे शक्य आहे. मात्र यामध्ये आधीच केलेले रिझर्व्हेशन आणि अन्य कोणत्या ट्रॅवल एजंसीमधून तुम्ही तिकीट बुक केले असेल तर हा पर्याय तुम्हाला वापरता येणार नाही.
ऑनलाईन पद्धतीने बुक केलेल्या तिकिटाचे बोर्डिंग स्टेशन 2 पद्धतीने बदलता येणे शक्य आहे. त्या कोणत्या हेच या बातमीतून स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत.
तिकीट बुकिंगच्यावेळी
1 सर्वात आधी रेल्वेच्या साईटवर तुमचे लॉगइन करा आणि पासवर्ड टाका.
2 त्यानंतर Form to station वर क्लिक करा. तसेच तारीख आणि तुम्ही निवडलेला क्लास पाहा. त्यानंतर तुमचे नाव पाहण्यासाठी सर्च बटणावर क्लिक करा.
3 पुढे तुम्हाला यादी दिसेल. यातील ट्रेन सिलेक्ट करा आणि पुन्हा Book Now या पर्यायावर क्लिक करा.
4 पॅसेंजर इनपुट असे पेज तुमच्यासमोर ओपन होईल. त्यानंतर येथे बोर्डिंग स्टेशन ऑप्शन असेल. यावर ड्रॉप चिन्ह असेल त्यावर क्लिक करा.
5 तेथे तुम्हाला तुम्ही सिलेक्ट केलेली ट्रेन कोणकोणत्या स्थानकात थांबत आहे ते दिसेल. येथे तुम्ही तुम्हाला हवे ते बोर्डिंग स्टेशन सिलेक्ट करू शकता.
6 स्थानक सिलेक्ट केल्यावर तुम्हाला पॅसेंजर डिटेल्स पुन्हा भरावे लागतील. ते भरून सबमिट करा.
तिकीट बुक केल्यानंतर बोर्डिंग स्टेशन बदलणे
1 सर्वात आधी IRCTC च्या साईटला भेट द्या. येथे तुम्हाला लॉगइन आणि पासवर्ड टाकावा लागेल.
2 त्यानंतर My Account – My Transection – Book Ticket History मध्ये जा.
3 आता तुम्हाला ज्या तिकिटाचे बोर्डिंग स्टेशन बदलायचे असेल ते सिलेक्ट करा आणि चेंज बोर्डिंग स्टेशनवर क्लिक करा.
4 पुढे तुम्हाला ट्रेनच्या मार्गातील स्थानके दिसतील. यातील तुम्हाला हवे ते स्थानक सिलेक्ट करा.
5 येथे तुम्हाला कॅन्फोमेशनसाठी विचारले जाईल त्यानंतर ओके बटणावर क्लिक करा.
6 यानंतर बोर्डिंग स्टेशन बदलले जाईल. आता स्टेंशन चेंज झाल्याचा मेसेज देखील तुम्हाला तुम्ही ज्या फोन नंबर वरून आधी तिकीट बुक केले आहे त्यावर येईल.