IRCTC Railway Confirm Ticket | खुशखबर! आता महिलांना ट्रेनमध्ये कन्फर्म सीट मिळणार, रेल्वे खात्याने केली ‘ही’ घोषणा

IRCTC Railway Confirm Ticket | जर तुम्हीही अनेकदा रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी तुम्हाला आनंददेईल. होय, यापुढे तुम्हाला ट्रेनमधील महिलांच्या सीटची चिंता करावी लागणार नाही. महिलांच्या सोयी-सुविधा लक्षात घेऊन गेल्या दोन दिवसांत रेल्वेमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. या घोषणेनुसार ज्याप्रमाणे बस आणि मेट्रोमध्ये महिलांसाठी जागा राखीव आहेत, तशाच आता लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्येही महिलांसाठी जागा राखीव असतील.

महिला प्रवाशांसाठी राखीव बर्थ
भारतीय रेल्वेने लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये महिला प्रवाशांसाठी खास बर्थ ची व्यवस्था केली आहे. याशिवाय महिलांच्या सुरक्षेसाठी ही विशेष योजना आखली जात आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये महिलांच्या आरामदायी प्रवासासाठी भारतीय रेल्वेने राखीव बर्थ बसविण्यासह अनेक सुविधा सुरू केल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली.

स्लीपर क्लासमध्ये सहा बर्थ राखीव राहणार
लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांमध्ये स्लीपर क्लासमध्ये सहा बर्थ राखीव ठेवल्या जातील, असे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. गरीब रथ, राजधानी, दुरंतो सह वातानुकूलित गाड्यांच्या थर्ड एसी डब्यात (थ्री एसी क्लास) महिला प्रवाशांसाठी सहा बर्थ राखीव ठेवण्यात येणार आहेत. प्रत्येक स्लीपर क्लासमध्ये सहा ते सात लोअर बर्थ, वातानुकूलित थ्री टायर (थ्री एसी) मध्ये चार ते पाच लोअर बर्थ असतील. वातानुकूलित टू टायर (टू एसी) डबे तीन ते चार लोअर बर्थ सीन ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षे किंवा त्यावरील महिला प्रवासी आणि गरोदर महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: IRCTC Railway Confirm Ticket for women’s rules check details on 19 February 2023.