 
						Railway Ticket Booking | प्रत्येक दिवसाला लाखो करोडोंच्या संख्येने रेल्वे प्रवासी प्रवास करत असतात. लांबच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी कमी पैशांत परवडणारे आणि जलद सेवा पुरवणारे रेल्वे हे साधन सर्वसामान्यांना आपल्या सोयीचे आणि फायद्याचे वाटते.
त्याचबरोबर रेल्वे आपल्या प्रवाशांना विविध प्रकारच्या मोफत सुविधा देखील प्रदान करते. तुमच्यापैकी फार कमी व्यक्तींना रेल्वेच्या मोफत सुविधांविषयी माहिती असेल. आज आम्ही रेल्वेकडून मिळणाऱ्या एकूण 5 सुविधांबद्दल सांगणार आहोत.
स्टेशनवरील फ्री वायफाय :
तरुणांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजेच इंटरनेट. सध्या इंटरनेटच्या विश्वात जगणारं हे युग रेंज मिळाली नाही तर काही सुचेनासं होतं. त्यामुळे खास रेल्वे प्रवाशांसाठी फ्री वायफायची सुविधा देण्यात आली आहे. बऱ्याचदा आपल्या फोनचा नेटपॅक संपला असल्याने ट्रेनच्या काही महत्त्वाच्या डिटेल्स आपल्याला ऑनलाइन पद्धतीने चेक करता येत नाहीत. यासाठीच रेल्वेने फ्री वायफायची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
फ्री वेटिंग हॉल सुविधा :
समजा तुमची ट्रेन लेट होणार असेल आणि रेल्वेवर तुम्ही तुमचं भरपूर सामान घेऊन उभे राहणार असाल तर, तुमच्यासाठी रेल्वेचा वेटिंग हॉल ही सुविधा अत्यंत फायद्याची ठरू शकते. यामध्ये तुम्हाला एसी आणि नॉनएसी दोन्ही प्रकारचे ऑप्शन दिले जातात. यासाठी तुम्हाला केवळ तुमचं तिकीट दाखवून सुविधांचा लाभ घ्यायचा असतो. असं केल्याने तुम्ही प्रवासाच्या आधी दमून जाणार नाही आणि तुमचा प्रवास सुखकर होण्यास देखील मदत होईल.
उशीर झाला तर, मोफत जेवण :
रेल्वेच्या काही अशा देखील ट्रेन आहेत ज्यामध्ये तुम्हाला 2 तासांपेक्षा जास्त प्रवास करावा लागला तर, मोफत जेवणाची सुविधा मिळते. शताब्दी एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस त्याचबरोबर दुरंतो यासारख्या प्रीमियम ट्रेनमध्ये अशा पद्धतीच्या सुविधा उपलब्ध असतात. त्याचबरोबर तुम्हाला तुमचं वेगळं जेवण ऑर्डर करायचं असेल तर, तुम्ही ट्रेनमधील केटरिंग सर्विसचा फायदा देखील घेऊ शकता.
प्रवासात मिळणार मोफत मेडिकल सुविधा :
प्रवासादरम्यान एखाद्या व्यक्तीची तब्येत अचानक बिघडली की, रेल्वेकडून मोफत चेकअपची सुविधा दिली जाते. यामध्ये प्रवाशाचे फ्री चेकअप केले जाते. समजा एखाद्या व्यक्तीची स्थिती अधिक गंभीर असेल तर, काही प्रमाणात शुल्क भरून तुम्ही तुमच्या आजारी व्यक्तीला रेल्वे मार्फत लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये देखील पोहोचवू शकता.
AC कोचमध्ये फ्री बेडरोल सुविधा :
तुम्ही एसी कोचमध्ये प्रवास करत असाल तर, रेल्वे कडून तुम्हाला चादर, उशी, बेडशीट आणि हॅन्ड टॉवेल देण्यात येते. काही ट्रेनमध्ये या सर्व गोष्टींचे 25 रुपये घेतले जातात. त्याचबरोबर स्लीपर क्लासमध्ये प्रवाशांना बेडरोलची सुविधा देखील मिळते. प्रवासादरम्यान तुम्हाला या सर्व सुविधा मिळाल्या नाही तर, तुम्ही कंप्लेंट करू शकता त्याचबरोबर रिफंडची मागणी देखील करू शकता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		