
Railway Ticket Booking | भारतीय रेल्वेने प्रवास करणे प्रत्येकालाच परवडते. इतर ट्रॅव्हल टूरपेक्षा रेल्वेचे तिकीट कमी दरात उपलब्ध होत असते. त्यामुळे लांबचा पल्ला गाठण्यासाठी बहुतांश प्रवासी रेल्वेने प्रवास करणे पसंत करतात. तरीही अनेकांच्या मनात असा प्रश्न उपस्थित होत असतो की, रिझर्वेशन केलेली सीट असून सुद्धा केवळ प्लॅटफॉर्मवर जास्त प्रमाणात गर्दी असल्यामुळे ट्रेन सुटली तर, प्रवासी व्यक्तीला त्याचे तिकिटाचे पैसे रिफंड होतात का. आज या बातमीपत्रातून आम्ही तुम्हाला तिकीट रिफंडविषयीची संपूर्ण माहिती सांगणार आहोत.
तिकीट रिफंड करण्यासाठी टीडीआर करणे गरजेचे :
ट्रेन सुटल्या कारणाने किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे तिकीट काढून देखील तुमचा प्रवास रद्द करावा लागत असेल तर तुम्हाला सर्वप्रथम टीडीआर फाईल करावी लागेल. टीडीआर म्हणजे (तिकीट डिपॉझिट रिफंड). रेल्वेचा चार्ट तयार झाल्याकारणाने तुम्हाला तिकीट कॅन्सल करता येणार नाही.
त्यामुळे लगेचच टीडीआर करून घ्या जेणेकरून तुम्हाला पैसे रिफंड मिळतील. त्याचबरोबर प्रवाशांना ट्रेन सुटण्याच्या 4 तास आधी टीडीआर दाखल करणे गरजेचे आहे. कारण की टीडीआर फाईल दाखल करण्यासाठी उशीर झाला तर प्रवाशांना रिफंड मिळण्याचे चान्सेस कमी असतात.
टीडीआर फाईल कशी तयार कराल :
टीडीआर फाईल तयार करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आयआरसीटीसी ऑनलाइन एप्लीकेशन डाऊनलोड करून घ्यावं लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचं लॉगिन करून घ्यायचं आहे. लॉगिन केल्यानंतर ट्रेन ऑप्शनवर क्लिक करून TDR ऑप्शनवर देखील क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे तिकीट निवडून फाईल टीडीआरवर क्लिक करायचं आहे. तुमची टीडीआर फाईल सिलेक्ट होऊन 60 दिवसांच्या आतमध्ये तुम्हाला तुमचे पैसे रिफंड होतील.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.