26 May 2022 11:54 PM
अँप डाउनलोड

भारतात दाखल झाली पहिली ‘ऑल इलेक्ट्रिक कार'..!!

hyundai kona electric, hyundai kona, hyundai cars

मुंबई : आधुनिक तंत्रज्ञानाच्या या युगात एकापेक्षा एक नवनवीन गोष्टी जगासमोर येत आहेत. त्यातच गांड्याना असणारी मागणी लक्षात घेऊन देशात इलेक्ट्रिक गाड्यांना वेगळा दर्जा मिळावा म्हणून ह्यूंदाईने ‘कोना इलेक्ट्रिक’ ही एसयूव्ही अलिकडेच बाजारात आणली. आधुनिक कलेचा उत्तम नमुना असलेली ही गाडी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. साधारण २५ लाख रुपये किंमत असलेली ही कोना गाडी भारतातली पहिली जास्त अंतर कापणारी गाडी आहे. बाह्य रचनेसोबतच या गाडीची आंतररचना सुद्धा तितकीच आकर्षक आहे. बसण्यासाठी आरामदायी अश्या ५ आसनांची रचना असलेल्या या गाडीमध्ये सहज हाताळता येणारा डॅशबोर्ड देण्यात आलेला आहे.

गाडीमध्ये स्पीडोमीटर, नेव्हिगेशन, तसेच इन्फोटेनमेण्टसंबंधी माहिती देणार पूर्णपणे डिजिटल पॅनल बसवण्यात आलेल आहे. डिजिटल पॅनलची सोय असलेली कोना ही ह्यूंदाईची भारतातली पहिली गाडी आहे. तसेच अँड्रॉइड ऑटो आणि ऍप्पल कार-प्लेसह सात इंची टचस्क्रिन सिस्टीम देण्यात आलेला आहे. शून्य ते शंभर किलोमीटरचा वेग ही गाडी ९.३ सेकंदात गाठते. या गाडीमध्ये दोन चार्जरचे पर्याय दिलेले आहेत. या चार्जद्वारे साधारण ३ तासांमध्ये ५० किलोमीटर अंतर कापण्याइतपत बॅटरी चार्ज होते. जागतिक बाजारपेठेत कोना ही गाडी पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे तर भारतात फक्त इलेक्ट्रिक प्रकारातउपलब्ध करण्यात आलेली आहे.

बाह्यरचना, आंतररचना, बॅटरी यासोबतच या गाडीच्या सुरक्षिततेवर सुद्धा तितकेच लक्ष देण्यात आलेले आहेत. या गाडीमध्ये सहा एअरबबॅग्स, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, रिअर कॅमेरा याची सोय करण्यात आलेली आहे. कलात्मकरीत्या रचना केलेली ही गाडी भारतीय बाजारपेठेत पोलार व्हाइट, टायफून सिल्वर, मरीना ब्यू आणि फॅन्टम ब्लॅक अशा चार रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे.मात्र छतावर पांढरा आणि काळा अशा दोन्ही रंगात उपलब्ध असून यासाठी ग्राहकांना अतिरिक्त २० हजार रुपये मोजावे लागणार आहेत.

ग्राहकांचा पुरेपुर विचार करुन रचना केलेली ही गाडी आपल्या आकर्षक वैशिष्ट्यांसमवेत बाजारात येण्यास सज्ज झाली आहे. ही गाडी खरेदी केल्यावर ग्राहक नक्कीच समाधानी असेल अशी हमी कंपनीतर्फे देण्यात आलेली आहे.तसेच या गाडीला स्पर्धा म्हणून किती कंपन्या भविष्यात अशाच प्रकारच्या गाड्या बाजारात आणणार याची उत्सुकता ऑटोक्षेत्राराला लागली आहे. आधुनिकतेचा अतिउत्तम नमूना असलेली ही गाडी देशात सर्वप्रथम ११ शहरांमध्ये विक्रीस उपलब्ध करण्यात येणार आहे. यानंतर या गाडीची बाजारातली मागणी लक्षात घेऊन गाडीच्या निर्मिती प्रक्रियेला वेग देण्यात येणार आहे.

हॅशटॅग्स

#cars(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x