6 December 2024 4:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | IRFC सहित 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRFC Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड Vedanta Share Price | वेदांता शेअर फोकसमध्ये आला, रॉकेट तेजीचे संकेत, सकारात्मक बातमी आली - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीचा मोठा निर्णय, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER EDLI Scheme | पगारदारांना सुखद धक्का; EDLI योजना 3 वर्षांनी वाढली, लाभ घेणे आणखीन झाले सोपे, वाचा सविस्तर - Marathi News HDFC Mutual Fund | 1 लाख रुपयांची गुंतवणूक बनवेल 39 लाखांचा फंड; ही म्युच्युअल फंड योजना पैशाचा पाऊस पाडेल Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर पुन्हा रॉकेट तेजीने परतावा देणार, स्टॉक चार्टवर फायद्याचे संकेत - NSE: SUZLON
x

पुणे | मतिमंद मुलीने 33 वर्षीय महिलेला गॅलरीतून ढकलून दिले | घटना CCTV'त कैद

mentally ill, minor girl, threw a mentally ill woman

पुणे, ०१ मार्च: पुण्यातील कोथरुडमधून अत्यंत भीषण घटना घडली आहे. एका मानसिकदृष्ट्या आजारी अल्पवयीन मुलीने (वय वर्षे 14) मानसिकदृष्ट्या आजारी महिलेला (वय वर्ष 33) इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन खाली फेकले. या घटनेत त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. (A mentally ill minor girl threw a mentally ill woman down from the building)

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना 26 फेब्रुवारी सायंकाळी 5 वाजता कोथरुडमधील भुसारी कॉलनीतील बाहुविकलांग प्रतिष्ठान भवनात घडली होती. पण, आज या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओत दिसत आहे की, एक मानसिक आजारी मुलगी त्या महिलेला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन खाली फेकते. अनिता टापरे नावाच्या महिलेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. (The shocking incident took place on February 26 at 5 pm at the Bahuviklang Pratishthan Bhavan in Bhusari Colony, Kothrud)

२६ फेब्रुवारीला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या रॅम्पवर ममता चालत होती. त्या वेळी अल्पवयीन मुलीने ममताला पाठीमागून येऊन, पकडून दुसऱ्या मजल्यावर नेले. त्यानंतर इमारतीवरून ढकलून देऊन, तिचा खून केला. अल्पवयीन मुलगी मुंबई येथील असून, तिला ताब्यात घेतले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक ए. एल. घोडके तपास करीत आहेत.

कोथरुड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ममता मोहन डोंगरे (33) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी मानसिक आजारी अल्पवयीन मुलीविरोधात खटला दाखल करुन तिला ताब्यात घेतले आहे. आरोपी मुंबईतील रहिवासी असून, मागील एका महिन्यापासून एका NGO कडून चालवल्या जाणाऱ्या दिव्यांग केंद्रात राहत होती. (The deceased was identified as Mamta Mohan Dongre age 33)

कोथरुड पोलिस उप-निरीक्षक अमोल घोडके यांनी सांगितले की, व्हिडिओत दिसले की, आरोपी मुलगी महिलेला धक्कादेऊन रँपजवळ घेऊन जाते आणि नंतर उचलून खाली फेकते. ती खाली पडल्याचा आवाज आल्यानंतर संस्थेतील काही जणांनी तिला हॉस्पीटलमध्ये नेले, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अॅक्सीडेंटल डेथ रिपोर्ट (आत्महत्या) दाखल केली होती, परंतु CCTV फुजेट समोर आल्यानंतर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.

 

News English Summary: A very horrible incident has taken place from Kothrud in Pune. A mentally ill minor girl (age 14) threw a mentally ill woman (age 33) down from the second floor of the building. The woman died on the spot.

News English Title: A mentally ill minor girl threw a mentally ill woman down from the building news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x