27 July 2024 4:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity on Salary | खुशखबर! 35 हजार पगार असणाऱ्या खाजगी नोकरदारांना ग्रॅच्युइटी इतकी रक्कम मिळणार Railway Ticket Booking | रेल्वे प्रवाशांनो! जनरल कोट्यातून लोअर बर्थ सीट मिळवता येईल, माहित असणं गरजेचं आहे EPF Pension Money | 90% पगारदारांना माहित नाही, EPFO कडून 7 प्रकारच्या पेन्शन मिळतात, फायद्याची अपडेट Lakshmi Narayan Rajyog | लक्ष्मी-नारायण योग 'या' 3 राशींसाठी ठरणार अत्यंत शुभ, आर्थिक नशीब उजळवणार FD Investment Money | 1 वर्षाच्या रु.1,50,000 FD वर कोण अधिक रक्कम देईल? SBI, पोस्ट ऑफिस, HDFC की ICICI? Gold Rate Today | खुशखबर! सोनं खरेदीची योग्य वेळ, आज सोनं 5149 रुपयांनी स्वस्त झालं, भाव धडाम झाले Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात दर महिना रु.20,050 येतील, महिना खर्चाची चिंता मिटेल
x

कर नाही त्याला डर कशाला? | सचिन वाझे स्वत:हून ATS कार्यालयात चौकशीसाठी हजर

Police officer Sachin Vaze, TRP Scam, Mansukh Hiren

मुंबई, ११ मार्च: कर नाही त्याला डर कशाला? याच उद्धेशाने पोलीस अधिकारी सचिन वाझे स्वतःहून ATS कार्यालयात हजर झाले आहेत. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळं चर्चेत आलेल्या सचिन वाझे यांची दहशतवाद विरोधी पथक (ATS) ने जवळपास १० तास चौकशी केल्याचं वृत्त आहे. मी ती स्कॉर्पिओ वापरली नाही, माझा धनंजय गावडेंना ओळखतही नाही, अशी माहिती सचिन वाझेंनी एटीएसला दिली.

सध्या महाराष्ट्र एटीएस मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाची चौकशी करत आहे.अधिवेशन काळात वाझेंवर विरोधकांनी अनेक आरोप केले आहेत. या आरोपानंतर वाझे स्वत: हून ATS च्या समोर गेले होते, अशी माहिती प्रसार माध्यमांकडे आली आहे.

मी ती स्कॉर्पिओ वापरली नाही. धनंजय गावडेशी माझा संबध नाही. मी त्यांना ओळखतही नाही,” अशी माहिती सचिन वाझेंनी एटीएसला दिली आहे. तसेच सचिन वाझे यांनी त्यांच्या गाडीचा एक गाडी पाठलाग करत असून त्याचा नंबर बनावट आहे, असा दावा केला होता. अशाप्रकारे पाळत ठेवल्याप्रकरणी वाझे एटीएस प्रमुख जयजीत सिंग यांची भेट घेणार आहे.

दरम्यान शिवसेनेने देखील फडणवीस आणि भाजपवर सडकून टीका केली आहे. अर्णब गोस्वामी याने केलेल्या छळामुळे अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली व हे प्रकरण फडणवीस मुख्यमंत्री असताना सरकारने दाबले होते. या प्रकरणाची फाईल सचिन वाझे यांनी उघडली व अर्णब गोस्वामी यास तुरुंगात टाकले. अर्णब गोस्वामी याने ‘टीआरपी’ घोटाळा करून सगळय़ांचीच फसवणूक केली. या टीआरपी घोटाळय़ाचा तपासही वाझे हेच करीत आहेत. अर्णब गोस्वामी यास आत्महत्या, टीआरपी घोटाळय़ात जाबजबाब द्यावा लागेल, सचिन वाझे त्याची गर्दन पकडतील म्हणून वाझे यांच्या विरोधात विरोधी पक्ष आदळआपट करीत आहे काय?

 

News English Summary: Police officer Sachin Vaze himself has come to the ATS office for the same purpose. The Anti-Terrorism Squad (ATS) has reportedly questioned Sachin Vaze for nearly 10 hours over the death of Mansukh Hiren. “I didn’t use that Scorpio, I don’t even know Dhananjay Gawde,” Sachin Vaze told ATS.

News English Title: Police officer Sachin Vaze himself has come to the ATS office over Mansukh Hiren case news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x