28 June 2022 6:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO Investment | व्हिस्की मेकर कंपनी ऑफिसर्स चॉइस IPO लाँच करणार | गुंतवणुकीची संधी Mutual Fund Investment | या आहेत पैसे दुप्पट-तिप्पट करणाऱ्या म्युच्युअल फंड योजना | फंडस् लक्षात ठेवा Home Loan Top-Up | कर्जाच्या ईएमआयने घराशी संबंधित खर्च भागत नाही? | टॉप-अपचा पर्याय निवडा RD Vs SIP | या 2 पर्यायांपैकी कशामध्ये दर महिन्याला रु. 2000 गुंतवणूक करणे अधिक योग्य आहे | फायद्याचं गणित जाणून घ्या Maharashtra Govt Recruitment | महाराष्ट्र पोलीस भरती संबंधित नवीन जीआर प्रसिद्ध | संपूर्ण GR वाचा शिवसेना पूर्णपणे संपविण्यासाठी दिल्लीत जोरदार बैठका | आता शिंदेंवर सेनेचे खासदार फोडण्यासाठी दबाव वाढवला? शिंदेसोबत बैठकीसाठी फडणवीस दिल्लीला | सोबत वकिल महेश जेठमलानी सुद्धा | शिंदे गट कायद्याच्या कचाट्यात
x

सचिन वाझेंना 10 दिवसांची NIA कोठडी | तर फडणवीसांची पत्रकार परिषद

Sachin Vaze, Devendra Fadnavis, NIA Court

मुंबई, १४ मार्च: मनसुख हिरेन प्रकरणामध्ये सचिन वाझे यांच्यावर कारवाई करण्यात आली. यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. हिरेन प्रकरण विरोधी पक्षनेत्यांनी उचलून धरले. यासोबतच मुंबई पोलिसांवर केलेल्या आरोपांबद्दल सत्ताधारी आणि विरोधीपक्ष समोरासमोर आले आहेत.

मनसुख हिरेन प्रकरणामुळे चर्चेत असलेले सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयएच्या विशेष न्यायालयाने 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता सचिन वाझे यांची कसून चौकशी करण्याचा राष्ट्रीय तपासयंत्रणेचा (NIA) मार्ग मोकळा झाला आहे. ‘एनआय’च्या वकिलांनी सचिन वाझे यांची 14 दिवसांची कोठडी द्यावी, अशी मागणी केली होती. यापूर्वी शनिवारी NIA ने सचिन वाझे यांनी तब्बल 13 तास चौकशी केली होती. या चौकशीनंतर ‘एनआयए’ने सचिन वाझे यांना अटक केली होती.

या पार्श्वभूमीवर आज माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केलं आहे. “आता तर नुसती सुरूवात झाली आहे; एकच भाग बाहेर आला आहे, दुसरा भाग अत्यंत महत्वाचा आहे” असं फडणवीस म्हणाले आहेत.

तसेच, “परंतु माझं मत असं आहे की, अजुन यातला एकच भाग बाहेर आलेला आहे. दुसरा भाग अत्यंत महत्वाचा आहे. मनसुख हिरेन यांची जी हत्या आहे, आता तर ही गाडी त्या ठिकाणी ठेवल्याचा जो गुन्हा आहे. त्या गुन्ह्याच्या संदर्भात आज एनआयएने आज रिमांड मागितला आहे. परंतु, मनसुख हिरेन हत्याप्रकरण देखील महत्वाचं आहे. त्यामध्येही प्रचंड मोठे धागेदोरे आणि पुरावे हे मला असं वाटतं की, तपासयंत्रणांना उपलब्ध होत आहेत. त्यामध्येही लवकरच कारवाई होईल अशी माझी अपेक्षा आहे.” असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

 

News English Summary: A special NIA court has remanded Assistant Inspector of Police Sachin Vaze in custody for 10 days in connection with the Mansukh Hiren case. Therefore, the way is now open for the National Investigation Agency (NIA) to thoroughly investigate Sachin Vaze.

News English Title: Sachin Vaze sends to 10 days police custody by NIA special court Mumbai news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(692)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x