26 April 2024 2:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली Bonus Shares | खरेदी करा हा शेअर! फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील, शेअरने 6 महिन्यांत 210% परतावा दिला Post Office Interest Rate | होय! या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, फायद्याचा मोठा व्याज दर
x

TRP घोटाळा प्रकरण कमजोर करण्यासाठी सचिन वाझेंविरुद्ध षडयंत्र? | चर्चा जोरात

TRP scam, API Sachin Vaze, Politics, Arnab Goswami

मुंबई, १३ मार्च: देशातील बहुचर्चित टीआरपी घोटाळा प्रकरणात पोलिसांची बाजू न्यायालयात देखील भक्कम झाली आहे. त्यात पार्थो दासगुप्ता सध्या जामिनावर सुटले असले तरी त्यांच्या चौकशीतच व्हाट्सअँप चॅट लीक झाल्यानंतर अर्णब गोस्वामी यांचा खरा चेहरा देशा समोर आला. याच चाट हिस्टरी मध्ये अनेक केंद्रीय मंत्र्यांचा देखील उल्लेख असल्याचं पाहायला मिळाला होता.

TRP घोटाळा प्रकरणी न्यायालयात देखील पोलिसांच्या बाजूने खटला भक्कम झाल्याचा अंदाज या संबंधित आरोप असलेल्यांना आला होता. मुंबई पोलिसांच्या बाजूने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल मुंबई हायकोर्टात बाजू मांडत आहेत. दुसऱ्या बाजाला मोठी कारवाई होणार या भीतीने अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात कठोर कारवाई करू नये यासाठी त्याने कोर्टात दाद मागितली होती. त्यालाच अनुसरून तूर्तास अर्णब गोस्वामी यांना अंतरिम संरक्षण कायम ठेवावे, अशी विनंती अॅड. निरंजन मुंदरगी यांनी कोर्टाकडे केली होती. ती विनंती मान्य करत हायकोर्टात याप्रकरणी १५ जानेवारी पर्यंत कठोर कारवाई न करण्याची ग्वाही कायम ठेवण्याची तयारी सिब्बल यांनी मुंबई पोलिसांच्या वतीने दर्शवली होती. त्यानंतर कारवाईबाबत नेमकं काय झालं याची कोणतीही माहिती नाही.

व्हाट्सअँप चाट लीक नंतर अर्णब गोस्वामी देखील मुंबईत नसल्याचं समोर आलं होतं. त्यावरून सर्व अन्दाज येत होता. सचिन वाझे हे TRP घोटाळा चौकशी प्रकरणी मुख्य अधिकारी आहेत. त्यात अचानक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर ठेवलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणावरून पुढे आलं. महत्वाची गोष्ट म्हणजे राज्यातील विरोधी पक्षाने संपूर्ण अधिवेशन सचिन वाझे केंद्रित केल्याचं पाहायला मिळाल्याने अनेक शंका उपस्थित होऊ लागल्या होत्या. त्यानंतर हसमुख हिरेन प्रकरणात ATS असताना देखील NIA’ला प्रवेश देण्यात आल्याने सचिन वाझे यांना शिस्तबद्ध लक्ष केलं जात नाही ना अशी शंका सत्ताधाऱ्यांच्या मनात देखील बळावत गेली. त्यात आता यामध्ये सचिन वाझेंनी ठेवलेल्या व्हाट्सअँप स्टेटसवरून सहकारीच आपल्याला गोवण्याचा प्रयत्न करत आहेत असा अप्रत्यक्ष आरोप करताना थेट “जगाचा निरोप घेण्याची वेळ आली आहे” अशा धक्कादायक शब्दओळ लिहिल्या आहेत.

त्यात अत्यंत महत्वाची गोष्ट जी कदाचित कोणाच्या निदर्शनास आली नसावी आणि ती म्हणजे महाराष्ट्रातील कोणत्याही विषयावर गरळ ओकणाऱ्या रिपब्लिक टीव्हीवर सचिन वाझेंशी संबंधित प्रकरणात देखील पूर्ण शांतता आहे आणि ‘पूछता है भारत” सारखे डिबेट दिसत नाहीत. त्यामुळे ‘सायलेंस स्पिक्स लाऊडर दॅन वर्ड्स’ असंच म्हणावं लागेल.

 

News English Summary: The police side has also been strong in court in the country’s most talked about TRP scam case. Although Partho Dasgupta is currently out on bail, Arnab Goswami’s real face came to light after a WhatsApp chat was leaked during his interrogation. Many Union Ministers were also mentioned in the same chat history.

News English Title: TRP scam investigation office Sachin Vaze on radar of politics news updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x