13 December 2024 9:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

मोदीजी माझ्या वडिलांना वाचवा | तीच खेळी पार्थो दासगुप्तांच्या मुलीच्या पत्रा आडून? | रिपब्लिकची पब्लिसिटी

TRP scam, Partho Dasgupta, daughter Pratyusha Dasgupta, Arnab Goswami

मुंबई, १७ जानेवारी: काही दिवसांपूर्वी अर्णब गोस्वामी हे रायगड पोलिसांच्या ताब्यात होते. त्यावेळी अर्णब गोस्वामी यांची अलिबाग येथील मराठी शाळेतील उपकारागृहातून तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. तत्पूर्वी Republic TV’चे संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ४ नोव्हेंबर रोजी रायगड आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त टीमने त्यांच्या राहत्या घरातून सकाळी अटक केली होती. तिथून त्यांना थेट अलिबाग येथे नेण्यात आले होते.

दरम्यान, अर्नबला तळोजा कारागृहात घेऊन जातं असताना तेथे केवळ रिपब्लिकचे दोन प्रतिनिधी उपस्थित होते. त्या दोन रिपोर्टरकडे अर्नबने माझ्या जीवाला धोका असून सर्वोच्च न्यायालयाने आणि केंद्र सरकारने लक्ष घालावं. तसेच मला माझ्या वकीलांशी बोलू दिलं जातं नाही असा कांगावा त्याने स्वतःच्याच रिपोर्टरकडे केला होता. त्यानंतर याच बाईटचा आधार घेत रिपब्लिकन समाज माध्यमांवर तथ्यहीन ट्रेंड आणि कांगावा सुरु केल्याचं निदर्शनास आलं होतं. विशेष म्हणजे रिपब्लिकच्या एका ट्विटमध्ये तर अर्नबला सकाळी जेलरने मारहाण केल्याचं म्हटलं होतं. मात्र दुसरी विचारात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जर त्याला घेऊन जाण्यापूर्वी तो स्वतः सांगतो आहे की मला माझ्या वकीलांशी बोलू दिलं जातं नाही, मग त्यानंतर जेलमध्ये गेलेल्या अर्नबच्या संबधित बातम्या रिपब्लिकच्या न्युज रूममध्ये कुठून धडकत होत्या याबद्दल रिपब्लिक भाष्य करण्यास तयार नव्हता.

मात्र आता ज्यांच्यामुळे अर्णब गोस्वामी अडचणीत आला आहे, त्या पार्थो दासगुप्तांच्या बचावासाठी तेच तंत्र पुढे केलं जात असल्याची शंका उपस्थित होऊ लागली आहे. कारण पार्थो दासगुप्ता यांची कन्या प्रत्युषा दासगुप्ता हिने थेट पंतप्रधांना पत्र लिहून वडिलांच्या जीवाला धोका असल्याचं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी यामध्ये लक्ष घालावं असं म्हटलं आहे. विशेष म्हणजे अन्वय नाईक यांच्या कुटूंबियांची कोणतीही पत्र न दिसणाऱ्या अर्नबला पार्थो दासगुप्ता यांची कन्या प्रत्युषा दासगुप्ता हिचं पत्र लगेच निदर्शनास आलं असून त्याला पब्लिसिटी दिसण्यास सुरुवात देखील केली आहे.

 

News English Summary: Now, there are suspicions that the same tactics are being used to save Partho Dasgupta, who has put Arnab Goswami in trouble. Because Partho Dasgupta’s daughter Pratyusha Dasgupta has written a letter directly to the Prime Minister saying that her father’s life is in danger and Prime Minister Modi has asked her to pay attention to this. It is noteworthy that the letter of Partho Dasgupta’s daughter Pratyusha Dasgupta, who did not see any letter from Anvay Naik’s family, was immediately noticed and it has also started appearing in public.

News English Title: TRP scam Partho Dasgupta daughter Pratyusha Dasgupta wrote a letter to PM Narendra Modi to help news updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x