17 April 2021 11:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
लस घेतल्यानंतर शरीरात अँटीबॉडीज असल्याने विषाणूचा फार वाईट परिणाम होणार नाही - डॉ. गुलेरिया पियुष गोयल महाराष्ट्रातून राज्यसभेवर | पण संकटात महाराष्ट्रावर निर्लज्ज राजकारणाचा आरोप राज्यावर कोरोना संकट | राष्ट्रवादीच्या आमदाराने उभारलं ११०० बेडचं कोविड सेंटर | १०० बेड्सना ऑक्सिजन सुविधा देशभरात रुग्णांना रेमडेसीवीर नाही, ऑक्सीजन नाही, अंत्यसंस्कारासाठी रांगा तरी मोदी निवडणुकीच्या प्रचारात कोरोनाची तिसरी लाट कधीही उसळेल | उद्धव ठाकरेंचं उद्योगांना नियोजनपूर्वक सज्ज राहण्याचं आवाहन तुम्ही 'प्रधान कोवइडियट' आणि सुपर स्प्रेडर आहात | देशाच्या इतिहासातील सर्वात निर्लज्ज पंतप्रधान - काँग्रेस नेत्याची टीका मुख्यमंत्र्यांनी ऑक्सिजन-रेमडेसिवीर संदर्भात मोदींना कॉल केला | पण ते प्रचारात आहेत असं उत्तर मिळालं
x

चिनी कंपन्यांकडून पीएम केअरला तब्बल ४९ कोटीचा निधी - सविस्तर वृत्त

49 crore donated, Chinese companies, PM Care

नवी दिल्ली, २८ जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ मार्च रोजी पीएम केअर्स फंडची घोषणा केली होती व पंतप्रधानांच्या आवाहनाचा आदर करत देशवासीयांनी या फंडासाठी देणग्या दिल्या आहेत. २९ मे रोजी पंतप्रधान कार्यालयाने आरटीआय कार्यकर्ते तेजा यांना उत्तर देत पीएम केअर्स फंड सार्वजनिक अधिकारात येत नसल्याचे कळवले होते. त्या पत्रव्यवहाराच्या आधारावर वकील सुरेंदर सिंह हुडा यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका केली होती.

BhagyaVivah Marathi Matrimonial

याचिकाकर्त्यांच्या दाव्यानुसार, या फंडात गेल्या दोन महिन्यांमध्ये १० हजार कोटी जमा झाले आहेत. यासंदर्भात सूर्यहर्ष तेजा यांनी १ एप्रिल रोजी माहितीच्या अधिकारात या फंडाची माहिती विचारली होती. कोरोनाविरोधातील लढय़ासाठी नव्याने तयार करण्यात आलेला पीएम केअर्स फंड माहितीच्या अधिकारात आणला जावा व या फंडासाठी कोणी किती पैसे दिले आणि ते कसे खर्च केले गेले याचा तपशील जाहीर केला जावा, अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात सादर करण्यात आली होती.

दरम्यान, या पीएम केअर फंडाला सर्वच थरातून निधी देण्यात आला आहे. सध्या देशात चीन विरोधी वातावरण निर्माण झालं असून, चिनी वस्तुंवर बहिष्कार टाकण्यासाठी अनेकांनी आवाहन केलं आहे आणि त्यात भाजपचे नेते, पदाधिकारी आघाडीवर आहेत. मात्र याच पीएम केअर फंडाला चिनी कंपन्यांकडून तब्बल ४९ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे.

यामध्ये Xiaomi कंपनीकडून १० कोटी, TikTok कंपनी कसून ३० कोटी, Huawei कंपनीकडून ७ कोटी रुपये, One Plus कंपनीकडून १ कोटी रुपये तर Oppo कंपनीकडून १ कोटींचा निधी मिळाला आहे. त्यामुळे चिनी कंपन्यांची ही रक्कम मोदी सरकार परत करणार का असा प्रश्न समाज माध्यमांवर विचारला जातं आहे.

 

News English Summary: At present, there is an anti-China atmosphere in the country, with many calling for a boycott of Chinese goods, with BJP leaders and office bearers at the forefront. However, the same PM care fund has received Rs 49 crore from Chinese companies.

News English Title: 49 crore donated from Chinese companies to PM Care News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1485)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x