आर्थिक प्रोत्साहनपर पॅकेज शेअर बाजारावर परिणाम करण्यात अपयशी
मुंबई, १५ मे २०२०: मागणीच्या बाबतीत चिंता कायम असल्याने सरकारने जाहीर केलेले २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक प्रोत्साहनपर पॅकेज शेअर बाजारावर परिणाम करण्यात अपयशी ठरल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले. परिणामी एस अँड पी बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी ५० निर्देशांकात शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये २ टक्क्यांची घसरण झाली. दिवस पुढे जाऊ लागला, तशी घसरण वाढत गेली. ३० शेअर सेन्सेक्सचा निर्देशांक ८८५.७२ अंक किंवा २.७७% नी घसरला. तो ३१,१२२.८९ अंकांवर बंद झाला. निफ्टी ५० चा निर्देशांक २४०.८० अंक किंवा २.५७% नी कमी झाला. तो ९,१४२.७५ अंकांवर बंद झाला.
अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया ७५.५६ रुपयांवर घसरला. यामुळे गुंतवणूकदार आणि व्यापा-यांच्या भावनांवर परिणाम झाला. सेन्सेक्सचे ३० पैकी २३ शेअर्स आज रेड झोनमध्ये बंद झाले. सर्वात मोठा फटका आयटी, बँक्स, ऑटो आणि एफएमसीजी क्षेत्रातील प्रमुख शेअर्सना बसला.
बँकिंग क्षेत्रासाठी बॅकफायर:
निफ्टी बँक इंडेक्स मागील ट्रेडिंग सेशनच्या तुलनेत ५६८.४५ अंक किंवा २.८८% च्या घसरणीसह १९०६८.५० अंकांवर बंद झाला. सरकारी मालकीच्या पंजाब नॅशनल बँकेने ३.९२% किंवा १.२० रुपयांची घसरण नोंदवली. तो २९.४० रुपयांवर बंद झाला. एचडीएफसी बँकेचा नफाही कोरोना व्हायरसवर केलेल्या अनपेक्षित तरतुदींमळेही कमकुवत पडला. अशा प्रकारे खासगी बँकांमध्ये सर्वोच्च भागीदारी असलेल्या खासगी क्षेत्राचा बँक शेअर बाजारात कमकुवत पडलेला दिसला. तो ८९३.८५ रुपयांवर बंद झाला. म्हणजेच ३३.८० रुपये किंवा ३.६४ टक्क्यांनी खाली आला.
टेक सेक्टरही रेड झोनमध्ये:
टेक महिंद्राच्या शेअरच्या किंमतीत ५.३२% किंवा २९.०० रुपयांची घसरण झाली. तो ५१५.७५ रुपयांवर बंद झाला. इन्फोसिस लिमिटेडदेखील लाल रंग दर्शवत बंद झाला. मागील ट्रेडिंग सेशनमध्ये ५.१०% ची घसरण होती. आज ज्या शेअर्सनी चांगला व्यापार केला, त्यात केमिकल आणि फर्टिलायझर्स, हेल्थकेअर सेक्टर्सदेखील होते.
इन्फ्रा क्षेत्रातही मंदी कायम:
ज्यांनी डेली चार्टमध्ये चॅनल पॅटर्न ब्रेकआउट प्रदान केला, त्यात अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडचा समावेश आहे. आजच्या घसरत्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक स्थैर्य प्रदान करण्यात यशस्वी ठरला. ट्रेडिंग सेशनच्या सुरुवातीला ३,४९१.०० रुपयांसह खालील स्तर गाठला आणि नंतर ४३.३० रुपये किंवा १.२२% च्या वृद्धीसह ३,५९०.०० रुपयांवर बंद झाला. जेके सिमेंट आजच्या सर्वात मोठ्या घसरणीसह १,०७४ रुपयांवर बंद झाला. याने शेअरमध्ये ५.३०%ची घसरण दर्शवली.
News English Title: Amar Dev Singh Chief Adviser Angel Broking Ltd talked about Stock Market after atmanirbhar bharat package News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा