13 December 2024 2:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम IPO GMP | स्वस्त IPO येतोय रे, शेअर प्राईस बँड 35 रुपये, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, GMP संकेत - GMP IPO Horoscope Today | काही वेळातच 'या' राशींना मिळणार आनंदाची बातमी; जीवनात नवीन संधी प्राप्त होतील तर, काहींना पैसा
x

५ वर्षांत महागाईचा उच्चांक! मोदी सरकारच्या काळात सामान्यांचा खिसा खाली

Consumer Price Index, CPI crosses Limit, Inflation

नवी दिल्ली: सर्वसामान्यांना कांद्याच्या दराने रडवल्यानंतर भाजीपाल्यानेही गेल्या महिन्यात खिशाला कात्री लावली. डिसेंबर महिन्यात किरकोळ बाजारातील महागाई दराचे आकडे केंद्राकडून जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये गेल्या महिन्यात महागाईचा दर ७.३५ टक्के इतका झाला आहे. खाद्य पदार्थ आणि तेलांच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर महागाई दरात ही वाढ झाली. याआधी नोव्हेंबर २०१९ मध्ये महागाई दर ५.५४ टक्के इतका होता. गेल्या वर्षी याच काळात हा दर २.१९ टक्के होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हा महागाई दर ४ टक्के असेल असा अंदाज व्यक्त केला होता. नोव्हेंबरमध्ये तीन वर्षांचा उच्चांक गाठत महागाई दर ५.५४ टक्क्यांवर पोहोचला होता. जुलै २०१६ मध्ये ग्राहक मुल्य निर्देशांक ६.०७ टक्के इतका होता.

सरकारने आज जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार प्रामुख्याने खाद्यपदार्थांच्या भावात वाढ झाल्याने किरकोळ चलनवाढीत मोठी वाढ झाली आहे. डिसेंबर २०१८ च्या तुलनेत मागील महिन्यात अन्नधान्यांच्या भावात १४.१२ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. डिसेंबर २०१८ मध्ये ती उणे २.६५ होती. भाजीपाल्याच्या भावात तब्बल ६०.५ टक्‍क्‍यांनी वाढ झाल्यामुळे चलनवाढीत वाढ झाली आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या जुलै २०१६च्या महागाई दराच्या धोरणानुसार, किमान आणि कमाल दर २ ते ६ टक्‍क्‍यांदरम्यान असणे अपेक्षित आहे. डिसेंबरमध्ये त्यात वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या सहामाहीत किरकोळ चलनवाढीचा दर जास्त राहील, असा अंदाज आरबीआयने व्यक्त करून तो ४.७ ते ५.१ टक्‍क्‍यांदरम्यान राहील, असे म्हटले होते. डिसेंबर २०१९च्या किरकोळ चलनवाढीने रिझर्व्ह बॅंकेचे अंदाज खोटे ठरविले आहेत.

त्यात भाजीपाल्यांची दरवाढ थांबत नाही तोच आता साखर महागली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या वेगवेगळ्या वस्तूंच्या दरवाढीचे शुक्लकाष्ठ काही संपलेले नाही. त्यामुळे ग्राहकराजा पुरता चिंतेत असून, अचानकपणे झालेल्या साखरेच्या दरातील वाढ सणासुदीचा काळ कटू करणार की काय, असा सवाल उपस्थित झाला आहे.

त्यात ढासळत्या अर्थव्यवस्थेला दिलासादायी क्षण नसल्याचं पाहायला मिळत आहे. कारण सलग ३ महिन्यांच्या घसरणीनंतर नोव्हेंबर २०१९ मधील औद्योगिक उत्पादन वाढीचा दर वधारला आहे. मंदीने बेजार अर्थव्यवस्थेत सुधारणेचे संकेत देणारा हा महत्वाचा दिलासा आहे. निर्मिती क्षेत्राच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे औद्योगिक उत्पादन निर्देशांक या महिन्यात १.८ टक्के नोंदला गेला आहे.

 

Web Title:  Consumer Price Index OR CPI crosses Limit More than 7 percent in December 2019.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x