12 December 2024 6:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, चार्टवर तेजीचे संकेत - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा
x

पॅकेजबाबत अर्थमंत्री सीतारमण यांची आज ४ वाजता पत्रकार परिषद

Nirmala Sitharaman, PM Narendra Modi

नवी दिल्ली, १३ मे: सध्या देशात कोरोनाचं थैमान वाढत आहे. अशा परिस्थितीत मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या पॅकेजची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वावलंबी भारत अभियानाची घोषणा केली असून २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. “हे पॅकेज स्वावलंबी भारत अभियानाचा महत्त्वाचा भाग आहे. आतापर्यंत जाहीर करण्यात आलेली आर्थिक मदत आणि हे पॅकेज एकत्र मिळून २० लाख कोटींचं आहे. २०२० मध्ये जाहीर करण्यात आलेलं हे २० कोटींचं पॅकेज स्वावलंबी योजनेला नवी गती देईल”. हे पॅकेज जीडीपीच्या १० टक्के असल्याचंही मोदी म्हणाले होते.

दरम्यान, कोरोना लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय, उद्योग बंद अवस्थेत आहेत. अर्थव्यवस्थेला गती मिळत नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थव्यवस्थेला गती मिळण्यासाठी २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे. आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण या याबाबत ठोस माहिती आणि कसे असेल पॅकेज याबाबत संवाद साधणार आहेत. अर्थमंत्री पत्रकार परिषद घेणार आहेत. आधी एक वाजता त्या बोलणार होत्या. मात्र त्यांनी पत्रकार परिषदेची वेळ बदलली असून दुपारी ४ वाजता साधणार संवाद साधणार आहेत.

आर्थिक पॅकेजमध्ये सगळ्या घटकांचा विचार करण्यात आला असून त्यामधून कुटीर, लघु, मध्यम उद्योगांना दिलासा मिळेल. प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या मध्यमवर्गाला आर्थिक पॅकेजचा फायदा होईल. भारतीय उद्योग जगताला यामुळे नवं सामर्थ्य मिळेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. आर्थिक पॅकेजमुळे देशाच्या विकासाला गती मिळेल, देश स्वावलंबी होईल, असंदेखील पंतप्रधान पुढे म्हणाले होते.

 

News English Summary: Prime Minister Narendra Modi has announced a Rs 20 lakh crore package to boost the economy. Today, Finance Minister Nirmala Sitharaman will talk about concrete information and what the package will look like. The finance minister will hold a press conference.

News English Title: corona virus finance minister Nirmala Sitharaman address Media today over economic package announced by PM Narendra Modi News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x