21 October 2019 4:09 PM
अँप डाउनलोड

तब्बल ७९ कोटींचा GST बुडवल्याप्रकरणी मुंबईतून व्यापाऱ्याला अटक

पुणे : पुणे स्थित व्यापाऱ्याने ७९ कोटींचा जीएसटी बुडवल्याप्रकरणी मुंबईतून अटक करण्यात आलं आहे. सदर कारवाई जीएसटी कायद्यांतर्गत करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पुण्यातील मोदसिंग पद्मसिंह सोढा नामक व्यापाऱ्याला मुंबईतून अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. तब्बल ७९ कोटी रुपयांचा जीएसटी बुडवल्याप्रकरणी सोढा यांना मुंबईतून शुक्रवारी २६ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली असल्याची माहिती आहे. आज पुणे न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले होते, दरम्यान, न्यायालयाने सोढा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या