27 May 2022 4:36 AM
अँप डाउनलोड

एक दिवसाच्या मोठ्या ब्रेकनंतर पेट्रोल-डिझेल दर पुन्हा वाढले

मुंबई : एक दिवसाच्या मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा पेट्रोल-डिझेल दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. आजच्या नव्या दरांप्रमाणे मुंबईत पेट्रोल ६ पैसे प्रति लिटर महाग झाले आहे. यामुळे मुंबईत आजचा पेट्रोलचा प्रति लिटर दर ८९.६० तर डिझेलचा प्रति लिटर दर ७८.४२ झाला आहे. ऐन गणेश उत्सवादरम्यान सर्वसामान्यांना भीषण महागाईचा सामना करावा लागत आहे.

दिल्लीत सुद्धा हेच पेट्रोल दर ६ पैशांनी प्रति लिटरमागे महाग झाले आहे. त्यामुळे दिल्लीतील पेट्रोल दर प्रति लिटरमागे ८२.२२ रुपये तर डिझेलसाठी प्रति लिटर ७३.८७ रुपये दिल्लीतील लोकांना मोजावे लागत आहे. तर राज्यात बऱ्याच ठिकाणी दरांनी नव्वदी पार गेल्याचे वृत्त आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील रुपयाची घसरण असूच असल्याने आणि अमेरिकेचे इराणशी संबंध बिघडल्यामुळे त्याचा परिणाम तेलाच्या किंमतींवर होत आहे. तसेच केंद्र सरकारने जीएसटी आणला असला तरीही इंधन त्यापासून बाहेर ठेवल्याने सर्वच कठीण झालं आहे असं तज्ज्ञ बोलत आहेत.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1659)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x