26 April 2024 11:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

PM किसान सन्मान निधीचा हफ्ता मोदींनी स्वतःच्या बँक खात्यातून ट्रान्सफर केल्याप्रमाणे अनेक माध्यमांच्या हेडलाईन्स

PM Kisan Yojana Kisan Credit Card Loan

नवी दिल्ली, ०९ ऑगस्ट | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑनलाईन संवाद साधल्यानंतर देशातील PM किसान सन्मान निधी अंतर्गत तरतूद करण्यात आल्याप्रमाणे भारत सरकारने आज देशातील 9.75 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान किसान सन्मान निधीचा नववा हफ्ता जमा केला. आभासी पद्धतीने देशभरातील 9.75 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 19500 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.

किसान सन्मान निधीअंतर्गत 1.57 लाख कोटी वितरीतपंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात 1.57 लाख कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. किसान सन्मान निधीची रक्कम जमा केल्यानंतर पंतप्रधानांनी लाभार्थी शेतकऱ्यांशी संवादही साधला. फेब्रुवारी 2019 मधील अर्थसंकल्पात किसान सन्मान निधी योजनेची घोषणा करण्यात आली होती. यानंतर मार्च 2019 मध्ये योजनेचा पहिला हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. किसान सन्मान निधीचा नववा हफ्ता जमा जमा करण्यापूर्वी या योजनेअंतर्गत देशातील सुमारे 11 कोटी शेतकऱ्यांना 1.37 लाख कोटी रुपये वितरीत करण्यात आले होते अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली.

दरम्यान, यासंबंधित अनेक माध्यमांनी हेडलाईन मॅनेजमेंट केल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे अनेक पत्रकारांनी आणि नेटिझन्सने यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अनेक माध्यमांनी हेडलाईन्स अशा दिल्या आहेत अजून मोदींनी त्यांच्या व्यक्तिगत बँक खात्यातून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली असावी. अनेकांनी या पत्रकारितेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Headline management in PM Kisan Sanman Nidhi 9th installment transfer news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x