3 May 2025 1:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

नोकरी बदलल्यास 'असे' करा PF'चे पैसे ट्रान्सफर | वाचा ऑनलाईन स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

Online EPF transfer

नवी दिल्ली, १६ जून | EPF’चे पैसे जर तुम्हाला एकाच खात्यात ट्रान्सफर करायचे असतील तर त्याकरिता विशेष खटाटोप करण्याची आवश्यकता नाही. काही सोप्या ट्रिक्स वरून हे पैसे तुम्ही एकाच ठिकाणी जमा करू शकता. सरकारी व असरकारी कंपन्यांमध्ये मासिक पगारचा 12 टक्के भाग हा ईपीएफओ अंतर्गत पीएफ अकाउंट मध्ये जमा होत असतो. तर, कार्यालयातर्फे देखील तेवढाच भाग पीएफ अकाउंट मध्ये जमा होत असतो. यात 8.33 टक्के भाग ईपीएफ खात्यात जातो तर 3.67 टक्के भाग पेंशन खात्यात जमा होत असतो. सरकारी नियमांनुसार ज्या कंपन्यांमध्ये 2o पेक्षा अधिक कर्मचारी असतील तर त्यांचे ईपीएफओ अंतर्गत नोंदणीकरण करणे आवश्यक आहे.

कर्मचाऱ्यांच्या उज्वल भविष्यसाठी असणारी एपीएफ हि एक सरकारी गुंतवणूक योजना आहे. कर्मचारांच्या भविष्य सुरक्षित रहावे हा या योजनेचा प्रमुख उद्देश. ईपीएफ जमा होत असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला एक युएएन क्रमांक मिळतो. याआधारे कर्मचाऱ्यांना त्यांच्या पीएफ संबंधी सर्व विस्तृत माहिती जाणून घेता येते. जेव्हा तुम्ही कंपनीत कार्यरत असता तेव्हा तुमचे पीएफ अकाउंट वेगळे असले तर युएएन मात्र एकच असतो. चला तर मग जाणून घेऊया एका पीएफ खात्यामधून दुसऱ्या खात्यात पैसे कसे ट्रान्सफर करायचे.

लक्षात ठेवा-पीएफ ट्रान्सफर करण्याकरिता तुमचा युएएन क्रमांक ईएफओ मेंबर पोर्टल वर ऍक्टिवेट असणे आवश्यक आहे. तसेच युएएन ऍक्टिवेट करण्याकरिता वापरण्यात येणारा क्रमांक देखील सुरु असणे आवश्यक आहे. कारण, त्याच क्रमांकावर तुम्हाला ओटीपी मिळेल. तसेच खाता क्रमांक आणि आधार क्रमांक युएएनला संलग्न असणे देशील आवश्यक आहे.

ऑनलाईन पीएफ ट्रान्सफर करण्यासाठी तुमच्याकडे यूएएन अ‌ॅक्टिव्ह आणि पीएफ खात्याशी लिंक असणं गरजेचे असते. यूएएन नंबरद्वारे ईपीएफओच्या पोर्टलवर लॉगीन करुन तुम्ही जुन्या कंपनीत जमा झालेली रक्कम पाहू शकता. यासाठी तुम्हाला प्रथम यूएएन पोर्टलवर जाऊन यूएएन अ‌ॅक्टिव्ह करुन घ्यावा लागेल.

इपीएफओचे पैसे ट्रान्सफर कसे करायचे:
* सगळ्यात आधी EPFO ला यूनिफाईड मेंबर पोर्टल https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ वर जा. इथे यूनिव्हर्सल अकाऊंट नंबर (UAN) आणि पासवर्ड टाकून लॉगइन करा.
*  लॉगइन केल्यानंतर Online Services वर जा आणि Member-One EPF Account Transfer Request ऑप्शनवर क्लिक करा.
* यामध्ये तुम्हाला पर्सनल इन्फोर्मेशन आणि पीएफ अकाऊंट वेरिफाय करावं लागेल.
* यानंतर Get Details ऑप्शनवर क्लिक करा.
* आता तुमच्याकडे ऑनलाईन क्लेम फॉर्मची पुष्टी करण्यासाठी मागील नियोक्ता आणि वर्तमान नियोक्ता यांच्या दरम्यान निवड करण्याचा पर्याय असेल. तुम्ही अधिकृत सिग्नेटरी होल्डिंग डीएससीच्या उपलब्धतेवर आधारित हे निवडले आहे. * दोन मालकांपैकी कोणतेही निवडा आणि सभासद आयडी किंवा यूएएन द्या.
* यानंतर सगळ्यात शेवटी Get OTP ऑप्शनवर क्लिक करा. तुमचा रजिस्टर मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. नंतर ओटीपी सबमिट करा.
* ओटीपी वेरिफाय झाल्यानंतर कंपनीला ऑनलाईन मनी ट्रान्सफर प्रोसेस रिक्वेस्टसाठी जाईल.
* ही प्रक्रिया पुढच्या तीन दिवसांत पूर्ण होईल. सगळ्यात आधी कंपनी ती हस्तांतरित करेल. तर ईपीएफओचे फील्ड अधिकारी याची पडताळणी करतील.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: How to transfer EPF account easily with UAN from old employer passbook to new passbook know easy step by step process news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#EPFO(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या