14 December 2024 5:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

पीएम केअर फंडाच्या पारदर्शकतेवर पश्नचिन्ह | हिशोब सार्वजनिक करण्याची मागणी

Hundred former bureaucrats, PM Narendra Modi, Transparency, PM Care Fund

नवी दिल्ली, १७ जानेवारी: पीएम केअर पंडचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 100 माजी नोकरशाहांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पीएम केअर फंडाच्या पारदर्शकतेवर पश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या नोकरशाहांनी शनिवारी पंतप्रधानांना एक पत्रही लिहिलं आहे. कोणत्याही शंकांचं निरसन करण्यासाठी आणि जनतेला उत्तर देण्यासाठी पीएम केअर फंडात पारदर्शकता आणण्याची मागणी केली आहे. (Hundred former bureaucrats have questioned Prime Minister Narendra Modi on the transparency of the PM Care Fund)

पीएम केअर फंडाच्या प्रत्येक गोष्टीत पारदर्शकतेचा अभाव आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करताना राज्यांची सरकारं त्रस्त झाली होती. त्यांना आर्थिक मदतीची गरज होती आणि अजूनही आहे,” असंही या अधिकाऱ्यांनी पत्रात म्हटलं आहे. पीएम केअर फंडात किती निधी जमा झाला आणि किती खर्च करण्यात आला, याचा हिशोब सार्वजनिक करण्यात यावा, अशी मागणी अधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे. (An account of how much was raised and how much was spent in the PM Care Fund should be made public)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या या पत्रावर, माजी आयएएस अधिकारी अनिता अग्निहोत्री, एस. पी. अंब्रोसे, शरद बेहार, सज्जाद हासन, हर्ष मंदर, पी. जॉय ओमेन, अरुणा रॉय, के. पी. फाबियान, देव मुखर्जी, सुजाता सिंह आणि माजी आयपीएस अधिकारी ए. एस. दुलात, पी. जी. जे. नंबूदरी आणि जूलियो रिबेरो यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. दरम्यान, पीएम केअर फंडाला आयकरातून सूट देण्यात आली होती. संसदेतही यावरून बराच गदारोळ झाला होता. (The PM Care Fund was exempted from income tax. There was a lot of commotion in Parliament too)

 

News English Summary: The issue of PM Care Pand has come up once again. 100 former bureaucrats have questioned Prime Minister Narendra Modi on the transparency of the PM Care Fund. The bureaucrats also wrote a letter to the Prime Minister on Saturday. It has called for transparency in the PM Care Fund to address any doubts and answer the public.

News English Title: Hundred former bureaucrats have questioned Prime Minister Narendra Modi on the transparency of the PM Care Fund News updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x