पुणे: करचुकवेगिरी प्रकरणात प्राप्तिकर विभागाने पुणे परिसरातील एका व्यावसायिकावर धाड टाकली असून, त्यात तब्बल ९.५५ कोटीची रोकड जप्त केल्याचे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) गुरुवारी सांगितले. प्राप्तिकरांच्या छाप्यात आतापर्यंतचा सर्वात मोठी रोकड असल्याची देखील माहिती दिली आहे. सदर कारवाई ४ नोव्हेंबर रोजी करण्यात आल्याचे सीबीडीटीने सांगितले. परंतु अधिकाऱ्यांनी या व्यावसायिकाचे नाव उघड केले नाही.
सीबीडीटीने निवेदनात म्हटले आहे की, “व्यवसायाकडे त्याच्या राहत्या जागी अजून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम असल्याची माहिती मिळाली असून लवकरच ती देखील सापडेल अशी माहिती दिली आहे. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीच्या आधारे तातडीने कार्यवाही करुन रोकड जप्त करण्यात आली आहे. सदर कारवाई दरम्यान व्यावसायिकाला निवासस्थान आणि त्याच्या कार्यालय शोध मोहिमेचं वॉरंट देखील देण्यात आले.’
सीबीडीटीने सांगितले की सदर व्यक्ती बांधकाम, करार आणि रिअल इस्टेटशी संबंधित व्यवसायाशी संबंधित आहे. सर्च ऑपरेशन दरम्यान तब्बल ९.५५ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. पुणे प्राप्तिकर विभागाने पुण्यातल्या धाडीत आतापर्यंत जप्त केलेली ही सर्वात मोठा रोकड असल्याचं म्हटलं आहे. सदर प्रकरणात अद्याप पुढील चौकशी सुरू आहे असं देखील सांगण्यात आलं आहे.
