17 April 2021 10:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
लस घेतल्यानंतर शरीरात अँटीबॉडीज असल्याने विषाणूचा फार वाईट परिणाम होणार नाही - डॉ. गुलेरिया पियुष गोयल महाराष्ट्रातून राज्यसभेवर | पण संकटात महाराष्ट्रावर निर्लज्ज राजकारणाचा आरोप राज्यावर कोरोना संकट | राष्ट्रवादीच्या आमदाराने उभारलं ११०० बेडचं कोविड सेंटर | १०० बेड्सना ऑक्सिजन सुविधा देशभरात रुग्णांना रेमडेसीवीर नाही, ऑक्सीजन नाही, अंत्यसंस्कारासाठी रांगा तरी मोदी निवडणुकीच्या प्रचारात कोरोनाची तिसरी लाट कधीही उसळेल | उद्धव ठाकरेंचं उद्योगांना नियोजनपूर्वक सज्ज राहण्याचं आवाहन तुम्ही 'प्रधान कोवइडियट' आणि सुपर स्प्रेडर आहात | देशाच्या इतिहासातील सर्वात निर्लज्ज पंतप्रधान - काँग्रेस नेत्याची टीका मुख्यमंत्र्यांनी ऑक्सिजन-रेमडेसिवीर संदर्भात मोदींना कॉल केला | पण ते प्रचारात आहेत असं उत्तर मिळालं
x

अबब! | अब की बार खिसा फाटणार यार | डिझेल-पेट्रोलवर सेस | भडका उडणार?

India budget 2021, agricultural CESS, Petrol and Diesel

नवी दिल्ली, ०१ फेब्रुवारी: Budget 2021 LIVE : कोरोना प्रादुर्भावामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर यांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार आपल्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प सादर करणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सकाळी 11 वाजता सर्वसाधारण अर्थसंकल्प लोकसभेत सादर करण्यास सुरुवात केली आहे. कोरोना महामारी, अर्थव्यवस्थेचे रुतलेले चाक आणि बेरोजगारीचा गंभीर प्रश्न या सर्व समस्यांवर उपाय म्हणून यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. दुसरीकडे ज्या मुद्यांवर मोदी सरकार सत्तेत आलं त्याकडे सध्या मोदी सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचं पाहायला मिळतंय.

BhagyaVivah Marathi Matrimonial

आयकराच्या संरचनेसंदर्भात कोणतीही मोठी घोषणा करण्यात आलेली नसून बजेटकडे लक्ष लागलेल्या सर्वसामान्य करदात्यांना दिलासा मिळालेला नाही. आयकराच्या संरचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ७५ पेक्षा जास्त वय असलेल्यांना आयटी रिटर्नपासून मुक्ती, निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा. ७५ वर्षांवरील नागरिकांना पेन्शमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर रिटर्न भरण्याची गरज नाही असं त्यांनी सांगितलं आहे.

एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सामान्य लोकं कंटाळली असताना मोदी सरकारने त्यांना अजून एक धक्का दिला आहे. कारण डिझेलवर 4 रूपयांचा कृषी सेस, पेट्रोलवर 2.5 रुपयांचा कृषी सेस लावण्यात आल्यानं पेट्रोल लवकरच शंभरी पार करु शकते. केद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करताना याची घोषणा केली. पेट्रोलवर अडीच रुपये, तर डिझेलवर चार रुपये अधिभार आकारला जाणार आहे. या वाढीचा ग्राहकांवर परिणाम होणार नसल्याचंही सरकारनं स्पष्ट केलं आहे.

 

News English Summary: On the one hand, while the general public is fed up with rising petrol and diesel prices, the Modi government has given them another push. Because an agricultural CESS of Rs 4 has been imposed on diesel and an agricultural cess of Rs 2.5 on petrol, petrol can soon cross the 100 mark.

News English Title: India budget 2021 agricultural CESS on Petrol and Diesel news updates.

हॅशटॅग्स

#Budget 2021-22(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x