15 December 2024 12:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या विमानांवर बंदी | ब्रिटनमध्ये परिस्थिती हाताबाहेर

Indian govt, UK flights Ban, Corona Virus

नवी दिल्ली, २१ डिसेंबर: ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा आणि आधीच्या तुलनेत अधिक धोकादायक स्ट्रेन आढळून आल्यानं केंद्र सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ब्रिटनहून भारतात येणारी हवाई वाहतूक रोखण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी २२ डिसेंबरला रात्री ११ वाजून ५९ मिनिटांनी सुरू होईल. हा निर्णय ३१ डिसेंबरपर्यंत लागू असेल. (Indian govt has decided that all flights originating from UK to India shall be temporarily suspended till 31st December news updates).

ब्रिटनचे आरोग्य चिकित्सा अधिकारी क्रिस व्हिटी यांनी कोरोना विषाणूचे नवे रुप पहिल्या विषाणूपेक्षा वेगळे असेल, असं सांगितले. या विषाणूचा वेगाने संसर्ग होण्याची शक्यता असल्याने सार्वजनिक ठिकाणी अधिक काळजी घेण्याचे आवाहन क्रिस व्हिटी यांनी केले आहे. ब्रिटनने यापूर्वीच इतर देशांनी विमानसेवांवर बंदी घालण्याबाबत सुचवले होते.

युकेमध्ये करोना व्हायरसचा नवा प्रकार आढळल्याने तिथे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी लॉकडाउन पुन्हा एकदा लागू केला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता तिथल्या विमानांवर भारतात बंदी घालण्यात आली आहे.

 

News English Summary: Considering the prevailing situation in the UK, Indian govt has decided that all flights originating from the UK to India shall be temporarily suspended till 11:59 pm, 31st December. This suspension to start w.e.f. 11.59 pm, 22nd December said Ministry of Civil Aviation.

News English Title: Indian govt has decided that all flights originating from UK to India shall be temporarily suspended till 31st December news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x