14 July 2020 6:26 PM
अँप डाउनलोड

दसरा-दिवाळीतील खर्च डोईजड; घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ

LPG Cylinder, Gas, Petrol Diesel

नवी दिल्लीः १ ऑक्टोबर म्हणजेच आजपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. लागोपाठ दुसऱ्या महिन्यात सिलिंडरचे दर वाढल्यानं गृहिणीचं बजेट आता कोलमडणार आहे. देशातल्या मुख्य शहरातील विनाअनुदानित गॅस सिलिंडर १५ रुपयांनी महागला आहे. आज नवी दिल्लीत १४.२ किलोच्या विनाअनुदानित सिलिंडरसाठी ६०५ रुपये मोजावे लागणार आहेत. कोलकात्यात याच सिलिंडरचा दर ६३० रुपये द्यावे लागणार आहे. मुंबई, चेन्नईमध्ये १४.२ किलोच्या विनाअनुदानित सिलिंडरचे दर क्रमशः ५७४.५० आणि ६२० रुपये झाले आहेत. तर १९ किलोग्राम सिलिंडरची दिल्लीतली किंमत १०८५ रुपये झाली आहे. कोलकात्यात ११३९.५० रुपये, मुंबई १०३२.५० रुपये आणि चेन्नईमध्ये याच १९ किलोच्या सिलिंडरचे दर ११९९ रुपये आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दरम्यान, ऑगस्ट महिन्यात सिलेंडरच्या किंमतींमध्ये ६२.५० रुपयांची कपात करण्यात आली होती. सिलेंडरसाठी ऑगस्ट महिन्यात ५७४.५० रुपये मोजावे लागत होते. मात्र, सप्टेंबरमध्ये ही किंमत वाढवून ६०६.५० रुपये करण्यात आली होती. मात्र, ऑक्टोबरमध्ये पुन्हा ही किंमत वाढवण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबईप्रमाणेच देशभरात इतर ठिकाणी देखील घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्या आहेत. कोलकातामध्ये ६१६ वरून या किंमती ६३०वर गेल्या आहेत. तर चेन्नईमध्ये देखील ६०६वरून या किंमती ६२० रुपये करण्यात आल्या आहेत.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Inflation(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x