17 November 2019 9:47 PM
अँप डाउनलोड

मसूद अझहर जिवंत, पाकिस्तानी माध्यमं

Masood, Pakistani

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर हा भारतीय हवाईदलाने चढविलेल्या हल्ल्यात ठार झाल्याच्या वृत्ताने रविवारी खळबळ माजली. मात्र, आता पाकिस्तानी माध्यमांनी मसूदच्या नातेवाईकांचा हवाला देत मसूद जिवंत असल्याचा दावा केला आहे. तसेच जैश ए मोहम्मदने देखिल हे वृत्त फेटाळले आहे.

एका वृत्तानुसार २६ नोव्हेंबरच्या पहाटे भारताने केलेल्या बालाकोटवरील हल्ल्यात मसूद अझहर हा जखमी झाला होता व त्याचे रावळपिंडीच्या रुग्णालयात निधन झाल्याचे सांगितले जाते. तर दुसर्‍या वृत्तानुसार मसूद अझहर याचे मुत्रपिंड निकामी झाले होते. तो डायलिसीसवर होता. या आजारानेच त्याचा मृत्यू झाला. मात्र, जैश आणि पाकिस्तानी सरकार यांच्याकडून अधिकृत घोषणा झाली नव्हती. आता पाकिस्तानी माध्यमांनीही युटर्न घेतला असून मसूदच्या जवळच्या नातेवाईंकांचा हवाला देत तो जिवंत असल्याचे म्हटले आहे.

हॅशटॅग्स

#India Pakistan(23)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या