नवी दिल्ली : देशात मुंबई अहमदाबाद बुलेट-ट्रेन’बद्दल मोठा आभास निर्माण केला जात असल्याचे चित्र असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली होती. तसेच मुंबई अहमदाबाद बुलेट-ट्रेन ही मुंबई’ला महाराष्ट्रापासून तोडण्याच्या दूरदृष्टिकोनातून लादली जात असून त्याचा प्रत्यक्ष मुंबई आणि महाराष्ट्राला काहीच फायदा होणार नसून, त्यासाठी घेतल्या जाणाऱ्या कर्जाचा बोजा मात्र महाराष्ट्रावर लादला जाणार आहे. विशेष म्हणजे अहमदाबाद बुलेट-ट्रेन ही केवळ श्रीमंतांसाठी असून त्याचा राज्यातील सामान्यांना काहीच फायदा होणार नसल्याचे त्यांनी अनेकदा अधोरेखित केले आहे.

विशेष म्हणजे देशात मेट्रो मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले ई श्रीधरन ज्यांना देशातील वाहतूक व्यवस्थे संबंधित मोठ्या प्रकल्पांचे श्रेय जाते, ज्यामध्ये दिल्ली मेट्रो ट्रेन आणि कोकण रेल्वे सारख्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा समावेश आहे. त्यांनी सुद्धा बुलेट ट्रेन बाबत अनेक प्रश्न चिन्ह उपस्थित केली आहेत. त्याच्या अनुभवानुसार बुलेट ट्रेन हे केवळ श्रीमंतांच्या प्रवासच साधन असून ते सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेरचं आहे असं मत व्यक्त केलं आहे.

पुढे ते असं सुद्धा म्हणाले आहेत की, जगातील ज्या प्रगत देशांमध्ये आज बुलेट ट्रेन आहे, त्या देशांच्या तुलनेत भारत २० वर्ष मागे आहे. तसेच भारताला आज आधुनिक, सुरक्षित रेल्वे व्यवस्थेची गरज आहे. विशेष म्हणजे भारतीय रेल्वेने बायो-टॉयलेट, स्वच्छता आणि वेग या बाबतीत प्रगती केल्याचा दावा त्यांनी स्पष्ट पणे फेटाळून लावला आहे.

भारतीय ट्रेन बाबत अजून मत व्यक्त करताना श्रीधरन म्हणाले की, देशातील अनेक प्रसिद्ध ट्रेनचा सरासरी वेग सुद्धा कमी झाला आहे. तसेच देशातील केवळ ५० टक्के ट्रेनच वेळेवर धावतात असं स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे रेल्वे संबंधित अपघात टाळण्यासाठी कोणती सुद्धा सुधारणा झाली नसून देशात प्रति वर्षी २० हजार प्रवासी रेल्वे ट्रॅकवर अपघातांचे शिकार होतात. भारताची रेल्वे ही प्रगत देशातील रेल्वे पेक्षा २० वर्षांनी मागे असल्याचा शेरा सुद्धा मारला आहे. श्रीधरन यांच्या टीकेमुळे मोदी सरकार चांगलेच तोंडघशी पडल्याची चर्चा रंगली आहे.

राज ठाकरेंनंतर आता ‘मेट्रोमॅन’ ई श्रीधरन यांची सुद्धा बुलेट-ट्रेन बाबत नकारात्मक टीका