म्हाडा लॉटरी पुणे | घरांसाठी दलालाची गरज नाही | नागरिकांनी भूलथापांना बळी पडू नये
पुणे, २२ जानेवारी: म्हाडा’च्या माध्यमातून सर्वसामान्यांना दर्जेदार आणि माफक दरात हक्कांची घरे मिळवून देण्याचे काम सुरु आहे. ‘म्हाडा’ची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त असून यासाठी कोणत्याही दलालाची नेमणूक करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पुणे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडाचा विभागीय घटक) पुणे विभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या पुणे, सोलापूर, कोल्हापूर व सांगली येथील विविध योजनेतील एकूण ५ हजार ६४७ सदनिकांच्या सोडतीचा संगणकीय ऑनलाईन उद्घाटन समारंभ नेहरु मेमोरियल सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
म्हाडाच्या पुणे विभागाच्या 5647 घरांसाठी आज सोडत जाहीर केली जाणार आहे. यामध्ये अनेकांची पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमधील घरांचा समावेश आहे. दरम्यान यंदा देखील ही लॉटरी सोडत अर्जदारांना ऑनलाईन पाहता येणार आहे. नेहरू मेमोरियल हॉलमध्ये या म्हाडा घरांच्या लॉटरीचा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाईल. या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी अधिकाधिक अर्जदारांनी त्याच वेबकास्टिंग पहावं असं आवाहन करण्यात आले आहे. भाग्यवान विजेत्यांना घरबसल्या निकाल पाहण्याची सोय यंदा देखील उपलब्ध असेल. सोबतच ज्यांना या सोडतीमध्ये घर लागणार आहे त्यांना ई मेल, एसएमएस या द्वारा माहिती मिळणार आहे. (Pune Mhada lottery 2021 result to announce check winners list online)
म्हाडा लॉटरी उद्घाटन समारंभ 22 जानेवारीला सकाळी 9.30 वाजता सुरू होणार आहे. त्यानंतर सकाळी 10 वाजल्यापासून ऑनलाइन लॉटरी जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. ‘म्हाडा’च्या संकेतस्थळावरही निकाल पाहण्याची सुविधा असणार आहे. नागरिकांनी कोरोना संकटाचं भान ठेवत यंदा ऑफलाईन निकालाच्या ठिकाणी गर्दी करण्याऐवजी ऑनलाईन निकाल पहावा असं आवाहन करण्यात आले आहे.
निकाल कुठे पहाल?
म्हाडा लॉटरीचा पुणे विभागातील निकाल युट्युबवर येथे पाहू शकाल: http://bit.ly/PuneLottery2021
तर या संकेतस्थळावर उद्या सायंकाळी सहा वाजल्यानंतर निकालाची संपूर्ण यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. lottery.mhada.gov.in
पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये जाहीर करण्यात आलेल्या लॉटरी मध्ये यंदा 90 हजार अर्ज आले आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये 5217 घरं आहेत. पंतप्रधान आवास योजना, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, ‘म्हाडा’कडून बांधण्यात आलेले प्रकल्प आणि 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत ही घरं नागरिकांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
News English Summary: Through MHADA, work is underway to provide quality and affordable housing to the common man. The MHADA process is very transparent and corruption free and no broker has been appointed. Therefore, citizens should not fall prey to any misconceptions, appealed Deputy Chief Minister and Pune Guardian Minister Ajit Pawar.
News English Title: Mhada Pune lottery inaugurated by Deputy Chief Minister and Pune Guardian Minister Ajit Pawar news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट