23 September 2021 1:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

VIDEO | मुंबई विमानतळ गुजरातने टेकओव्हर केल्याने एरपोर्टवर आनंदोत्सव | हर्ष गोएंका यांचं धक्कादायक ट्विट

Harsh Goenka

मुंबई, १८ जुलै | गौतम अदानी यांच्या मालकीच्या अदानी समूहाने मुंबई विमानतळाचा कारभार हातात घेतला आहे. गौतम अदानी यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. मुंबई विमानतळाची शान आणखी वाढवणे हे आमचे आश्वासन आहे आणि ते आम्ही यशस्वीरित्या पूर्ण करु, असे अदानी यांनी ट्विटमध्ये म्हटले. या माध्यमातून देशभरात मोठ्याप्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल, असा दावाही गौतम अदानी यांनी केला आहे. त्यामुळे भविष्यात का बदल होतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडच्या मंगळवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. मुंबई विमानतळ व्यवस्थापनामध्ये अदानी समूहाचा ७४ टक्के हिस्सा असेल. जीव्हीके समूहाकडे असलेला ५०.०५ टक्के हिस्सा या समूहाने यापूर्वीच संपूर्णपणे मिळविला असून, आणखी २३.५ टक्के हिस्सा हा एअरपोर्ट कंपनी साऊथ आफ्रिका (एसीएसए) आणि बिडवेस्ट समूह या अन्य अल्पसंख्य भागीदारांकडून खरेदी केला जाईल, असे या संबंधीच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

मात्र आता दोनच दिवसात धक्कादायक गोष्टी मुंबई विमानतळावर घडू लागल्या आहेत. मात्र यावर RPG समूहाचे मालक हर्ष गोएंका यांनी मुंबई तळावरील एक व्हिडिओ ट्विट करत खळबळजनक वक्तव्य केल्याने मोठा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे त्यांच्या ट्विटवर गुजराती नेटिझन्स मुंबई आणि महाराष्ट्रावर थेट दावा ठोकताना तुम्ही काय केलंय महाराष्ट्रासाठी अशा गुर्मी दाखवणारे वक्तव्य करून स्वतःच्या मनातील सुप्त इच्छा व्यक्त करत आहेत. हर्ष गोएंका यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये मुंबई एअरपोर्टवर एक इव्हेन्ट साजरा होतं असून त्यात गुजराती गाण्यांवर नृत्य सुरु आहेत. त्यालाच अनुसरून हर्ष गोएंका यांनी म्हटलंय की, “मुंबई विमानतळ गुजरातने टेकओव्हर केल्याने एरपोर्टवर आनंदोत्सव”.

 

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Mumbai airport celebrating the takeover by Gujarat said Harsh Goenka news updates.

हॅशटॅग्स

#GautamAdani(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x