15 December 2024 12:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

रिअल इस्टेट सेक्टर पूर्ण बिघडण्याच्या स्थितीत, पवारांचं पंतप्रधानांना पत्र

NCP President Sharad Pawar, Wrote Letter, PM Narendra Modi

मुंबई, २८ मे: लॉकडाउनमुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेलाच झळ बसली आहे. अनेक क्षेत्रांवर याचा मोठा परिणाम झाला असून, सेवा क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी कामगार कपातही सुरू केली आहे. देशातील रिअल इस्टेट क्षेत्रालाही लॉकडाउनचा फटका बसला असून, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्ष देण्याची विनंती केली आहे. याविषयी शरद पवार यांनी पत्र पाठवलं आहे.

कोरोनामुळे देशातील बांधकाम व्यवसाय मोडकळीस आला आहे. मागील तीन महिन्यांपासून या क्षेत्रातील कामं बंद आहेत. त्यामुळे या क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. या क्षेत्रातील मजुरांचे स्थलांतरही मोठ्या प्रमाणात झाले आहे. यामुळे हे क्षेत्र अडचणीत आले आहे, त्याचा देशाच्या विकासदरावर परिणाम होत आहे. या व्यवसायाला अडचणीतून बाहेर आणण्यासाठी कर्जाचे पुनर्गठन, अतिरिक्त संस्थात्मक निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. तसंच व्याज माफ केले पाहिजे. बांधकाम क्षेत्रासाठी विशेष धोरणाचीही गरज आहे, असं पवारांनी या पत्रात नमूद केलं आहे.

कोरोनाच्या साथीमुळे देशभरात लॉकडाऊनदरम्यान देशातील रिअल इस्टेट सेक्टरच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तीव्र चिंता व्यक्त केली. “कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (सीआरईडीएआय) देखील यासंदर्भात एक पत्र लिहिले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्वरित हस्तक्षेप करून रिअल इस्टेट क्षेत्राला मदत करावी,” अशी विनंती पवार यांनी केली आहे.

 

News English Summary: The lockdown has hit the entire economy. This has had a major impact on many sectors, with many companies in the service sector also starting to cut workers. The country’s real estate sector has also been hit by the lockdown, with NCP president Sharad Pawar urging Prime Minister Narendra Modi to pay attention.

News English Title: NCP President Sharad Pawar Wrote Letter To PM Narendra Modi News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x