26 April 2024 11:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

न्यूज पोर्टल 'न्यूज क्लिक'ला परदेशातून 30 हजार कोटीचं फंडिंग | संबित पात्रांचा हास्यास्पद आरोप

Newsclick portal

नवी दिल्ली, १८ जुलै | न्यूज पोर्टल ‘न्यूज क्लिक’वर भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी जोरदार निशाना साधला आहे. त्यांनी या पोर्टलवर परदेशातून निधी घेऊन देशाची बदनामी करण्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, देशात जेंव्हा काही चांगले घडते तेंव्हा यांच्याकडून हे कार्यक्रम खराब करण्याचा प्रयत्न केला जातो.

आम्ही देशातील 130 कोटी लोकांना लस देण्यात गुंतलो आहे. परंतु, आमच्या सरकार बदनाम करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आम्हाला बदनाम करण्यासाठी या न्यूज पोर्टलला परदेशातून निधी उपलब्ध होत असल्याचा आरोप संबित पात्रा यांनी केला आहे.

संबित पात्रा पुढे म्हणाले की, देशातील महत्वाचे सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाला ही या पोर्टलकडून बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्यांच्याकडून यावर वारंवार प्रश्न उपस्थित केले गेले. परंतु, न्यायालयाने हा चांगला प्रकल्प असून त्यास पुढे घेऊन जाण्यास सांगितले होते. आमचे सरकार शेतकऱ्यांना देव मानते. परंतु, आमच्यातदेखील मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. जेंव्हापासून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेंव्हापासून ते परदेशी शक्तीला खटकत आहे. त्यामुळे त्यांना बदनाम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु आहेत असेही ते म्हणाले.

न्यूज क्लिक हे एक साधे पोर्टल असून याला पीपीके नावाच्या कंपनीद्वारे चालविले जाते. परदेशी संस्था या पोर्टलला निधी देत असून एफडीआयच्या माध्यमातून याला अर्थसहाय्य दिले जात आहे. ज्या कंपनीने न्यूज पोर्टलला वित्तपुरवठा केला आहे त्याचे नाव वर्ल्डवाइड मीडिया होल्डिंग कंपनी आहे. ही कंपनी अमेरिकेची असून याने न्यूजक्लिकला 30 हजार कोटी दिले असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Newsclick portal get funding from foreign countries said BJP spokesperson Sambit Patra news updates.

हॅशटॅग्स

#SambitPatra(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x