5 June 2023 11:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Alkyl Amines Chemicals Share Price | करोडपती स्टॉक! अल्काइल अमाइन केमिकल्स शेअरने गुंतवणुकदारांना 60000 टक्के परतावा दिला Anmol India Share Price | मालामाल शेअर! अनमोल इंडिया शेअरने 843% परतावा दिला, आता एका शेअरवर 4 फ्री बोनस शेअर्स मिळणार My EPF Money | पगारदारांनो! EPF कट होतं असेल तर लक्ष द्या, हे लोकच काढू शकतात पैसे, या कागदपत्रांची असेल गरज Loksabha Election 2024 | 2024 लोकसभेसाठी 9 वर्षात गमावलेल्या मित्रपक्षांपुढे भाजप हात पसणार, भाजप गुजरात लॉबीवर कोण विश्वास ठेवणार? Petrol Diesel Price Today | आजचे पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी झाले, तुमच्या शहरातील आजचे दर तपासून घ्या Sulochana Didi | निरागस अभिनयाने लाखो चाहत्यांची मने जिंकणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदींचे वृद्धापकाळाने निधन, त्या ९४ वर्षांच्या होत्या Cash Transactions | तुम्हीही खूप कॅश ट्रान्झॅक्शन्स करत असाल तर नियम जाणून घ्या आणि इन्कम टॅक्स नोटीस टाळा
x

दिवाळीत फटाके विक्रीला सुप्रीम कोर्टाची सशर्त परवानगी

नवी दिल्ली : काही दिवसांवर आलेल्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांच्या विक्रीला सर्वोच न्यायालयाने मंगळवारी सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे नागिरकांचा आणि विक्रेत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. त्यामुळे आता बच्चे कंपनीला नेहमीप्रमाणे फटाक्यांसह दिवाळी आनंदाने साजरी करता येणार आहे.

दरम्यान, फटाक्यांची ऑनलाइन विक्री करता येणार नाही, असे न्यायालयाने ठणकावले आहे. त्यानुसार देशभरातील ई-कॉमर्स साइट्सवरुन फटाके विक्रीला न्यायालयाच्या आदेशाने स्थगिती देण्यात आली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने फटाके विक्रीवर अंशतः घातलेली बंदी ही देशभरात लागू असून पर्यावरणाच्या रक्षणासाठी या आदेशांचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे असे न्या. ए. के. सिक्री आणि न्या. अशोक भुषण यांनी अखेरचा निर्णय देताना विनंतीपूर्व म्हटले आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार कमी प्रदुषण करणाऱ्या फटाक्यांचीच देशभरात विक्री केली जावी असे आदेश जारी करण्यात आले आहेत.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x