किरीट सोमय्या ईडीचे अघोषित प्रवक्ते? भविष्यातील कारवाईचे संकेत देण्याचा सपाटा
मुंबई, ५ जेनेवारी: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत काल ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या. वर्षा राऊत यांना ईडीकडून 5 जानेवारीला हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. मात्र, वर्षा राऊत एक दिवस अगोदर ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या. वर्षा राऊत यांना पीएमसी बँक प्रकरणी ईडीकडून समन्स बजावण्यात आले होते.
पीएमसी बँकेतील कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी वर्षा राऊत यांना 29 डिसेंबर रोजी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर वर्षा राऊत यांनी 5 जानेवारीपर्यंत मुदतवाढ मागितली होती. वर्षा राऊत यांना PMC बँकेतील खात्याशी संबंधित कागदपत्रं घेऊन कार्यालयात येण्यास सांगितलं आहे. संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधवी राऊत आणि वर्षा राऊत यांच्यात झालेले आर्थिक व्यवहार ईडीच्या रडारवर असल्याची माहिती आहे.
दरम्यान, याच प्रकरणात कोणत्या पक्षाचे नेते अडकणार आहेत आणि भविष्यात ईडीच्या रडारवर कोणत्या पक्षाचे नेते असणार आहेत याची माहिती भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या ईडीचे अघोषित प्रवक्ते असल्याप्रमाणे समाज माध्यमांवर देत आहेत. एकूण सर्व चौकशीची माहिती प्रथम त्यांच्या कार्यालयात दिली जात असल्याचं वातावरण सध्या पाहायला मिळत आहे. अगदी ईडीच्या पहाटे ४ वाजताच्या ट्विटवर देखील ते पहाटे काही मिनिटात म्हणजे ANI किंवा PTI पेक्षा जलद माहिती प्रसिद्ध करतात. त्यामुळे त्यांच्या भोवती देखील संशयाचे धुके जमू लागण्याची शक्यता आहे.
कारण पीएमसी बँकेतील घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची चौकशी सुरू आहे. या चौकशीतून आणखी एका शिवसेना नेत्याचं नाव समोर येणार आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी व्हिडिओ ट्वीटच्या माध्यमातून हा दावा केला आहे.
#संजयराऊत नंतर #शिवसेने चा आणखी एक नेता पीएमसी बँक घोटाळा चा लाभार्थी !! चौकशी व्हायलाच हवी @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil @mipravindarekar pic.twitter.com/tXfyTnVV72
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 5, 2021
पीएमसी घोटाळ्याशी नाव जोडलेला हा शिवसेनेचा नेता माजी खासदार असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे. मात्र, हा नेता कोण? हे सोमय्या यांनी स्पष्ट केलेलं नाही. पीएमसी घोटाळ्यात लाभार्थी ठरलेला हा नेता व त्याच्या कुटुंबीयांची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. त्यामुळं आता या नेत्याची सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.
News English Summary: MP Sanjay Raut’s wife Varsha Raut is being investigated in connection with the PMC Bank scam. The name of another Shiv Sena leader will come to light from this inquiry. Former BJP MP Kirit Somaiya has made this claim through a video tweet.
News English Title: One more Shivsena leader on ED radar says former BJP MP Kirit Somaiya news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा