27 June 2022 2:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Poco F4 5G | पोको F4 5G स्मार्टफोन सेल | 4000 रुपयांची सूट आणि फ्री हॉटस्टार, डिस्ने आणि यूट्यूब प्रीमियम New Labour Code | कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 4 दिवस काम, 3 दिवस विश्रांती | 1 जुलैपासून नियमांची अंमलबजावणी होणार? Maharashtra Political Crisis | महाविकास आघाडी सरकार अल्पमतात | सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष Maharashtra Political Crisis | सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यास भाजपाचा पॉलिटिकल प्लॅन तयार Zomato Share Price | झोमॅटोच्या शेअरमध्ये गुंतवणूक करा | 100 टक्के मल्टिबॅगर रिटर्न कमाई होईल नवाब मलिक मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी नव्हते | संजय दत्त होता | भाजपच्या स्क्रिप्टवर शिंदेंच्या जनतेला टोप्या Aadhaar Card | तुमच्या आधार कार्डशी संबंधित हे काम 3 दिवसांत करा | अन्यथा मोठे नुकसान होईल
x

सलग आठव्या दिवशी पेट्रोल, डिझेल महागलं...सामान्य माणूस हैराण

Petrol, Diesel, Price Hike

मुंबई, १४ जून : आज सलग आठव्या दिवशी इंधन दरवाढ झाली आहे. आज पेट्रोल ०.६२ रुपयांनी तर डिझेल ०.६४ रुपयांनी महागले असून दिल्लीतील आजचा पेट्रोलचा दर हा ७५.७८ रुपये आणि डिझेलचा दर ७४.०३ रुपये इतका झाला आहे. तर मुंबईत पेट्रोलचा दर ८२.१० रुपये आणि डिझेलचा दर ७२.०३ रुपये इतका झाला आहे.

दरम्यान, देशात लॉकडाऊन लागू झाल्यापासून पहिले ८२ दिवस तेल कंपन्यांनी इंधनाच्या दरात कुठलाही बदल केलेला नव्हता. मात्र आता या कंपन्यांनी सलग आठ दिवस इंधन दरवाढ केली आहे.

लॉकडाउनच्या काळात ८२ दिवस तेल कंपन्यांनी इंधनाच्या दरात कुठलाच बदल केला नव्हता त्यामुळे आता या कंपन्यांनी सलग आठ दिवस इंधन दरवाढ केल्याचे सांगितले जात आहे. तेल कंपन्यांनी केलेल्या या इंधन दरवाढीमुळे देशभरात सर्वत्रच ही दरवाढ होत आहे. मात्र, विविध राज्यांप्रमाणे त्याच्या दरात फरक पडतो. कारण, संबंधित राज्यांतील पेट्रोलवरील स्थानिक कर किंवा व्हॅट किती आहे? त्यावर तो अवलंबून असतो.

देशातील चार महानगरांमधील आजचे दर
दिल्ली – पेट्रोल (७५.१६), डिझेल (७३.३९)
मुंबई – पेट्रोल (८२.१०), डिझेल (७२.०३)
कोलकाता – पेट्रोल (७७.०५), डिझेल (६९.२३)
चेन्नई – पेट्रोल (७८.९९), डिझेल (७१.६४)

राज्यातील प्रमुख शहरांतील आजचे दर
पुणे – पेट्रोल (८१.८६), डिझेल (७०.७३)
नागपूर – पेट्रोल (८२.६१), डिझेल (७२.५९)
नाशिक – पेट्रोल (८२.४९), डिझेल (७१.३५)
औरंगाबाद – पेट्रोल (८३.१८), डिझेल (७३.१२)

 

News English Summary: Today is the eighth consecutive day of fuel price hike. Today, petrol is priced at Rs 0.62 per liter and diesel at Rs 0.64 per liter. In Delhi, petrol is priced at Rs 75.78 per liter and diesel at Rs 74.03 per liter.

News English Title:  Petrol Diesel Price Hike For Eighth Day In A Row See What Todays Rate Will Be News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Petrol Price(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x