3 May 2025 10:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

कोरोनाच्या संकटाला टर्निंग पाँईंट ठरवूया - पंतप्रधान

PM Narendra Modi, Indian Chamber of commerce, Corona virus, lockdown

नवी दिल्ली, ११ जून: आज आपल्याला अनेक वस्तूंची परदेशातून आयात करावी लागते. आपल्याला त्या वस्तू भारतात कशा तयार होतील याचा विचार करावा लागणार आहे. तसंच त्या आपण कशा निर्यात करू शकू हेदेखील पाहवं लागंल. लोकलसाठी व्होकल होण्याची हीच वेळ आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत मोठ्या बदलांची घोषणा करण्यात आली आहे आणि आता त्या प्रत्यक्षात साकारण्यात येत आहेत,” असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. करोना व्हायरसच्या संकटादरम्या त्यांनी आज इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या (ICC) विशेष कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केलं. त्यावेळी ते बोलत होते.

मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे;

  • ९५ वर्ष एखादी संस्था टिकणं ही खूप मोठी गोष्टी आहे. आयसीसीने नॉर्थ इस्टच्या विकासासाठी मोलाचं योगदान दिलं आहे. त्यांनी निर्माण केलेलं उत्पादन हे ऐतिहासिक आहे.
  • आयसीसीने आपल्या १९२५ च्या स्थापनेपासून स्वांतत्र्यचळवळही अनुभवली आहे. त्यामुळे कालानुरुप आलेले स्थित्यंतरं, संकटं त्यांनी पाहिली आहेत. शिवाय ग्रोथ ट्रॅजेक्टरीचेही ते भागीदार आहेत. त्यामुळे हा वार्षिक कार्यक्रम अशा काळात होतोय, ज्या काळात भारत अनेक संकटांशी सामना करतोय.
  • कोरोना व्हायरसविरोधात संपूर्ण जग लढत आहे. भारतालाही कोरोनाने घेरलं आहे. मात्र भारतात अनेक संकटं उभी आहेत. कुठे पूर आहे, कुठे टोळधाड आहे कुठे अतिवृष्टी आहे तर कुठे वादळ आहे. तर कुठे आसाममधील तेल विहिरींना आगी लागताहेत तर कुठे भूकंपाचे हादरे बदस आहेत.
  • कधी कधी काळ आपली परीक्षा घेतो. या परीक्षेत अनेक समस्या, अडचणी निर्माण होतात. मात्र याच काळात आपण आपलं कतृत्व, आपलं उज्ज्वल भविष्याची गॅरंटी घेऊ शकतो.
  • मन जेव्हा हरते तेव्हा आपण हरतो. त्यामुळे आपल्या मनाला आधी जिंकवायचं आहे, तरच आपण जिंकू शकू. म्हणजे, आपली संकल्पनाशक्ती, आपली इच्छाशक्तीच आपला पुढचा मार्ग ठरवू शकते. जो सुरुवातीलाच हार मानतो तो पुढे जात नाही.
  • या संकटातही आपण संकल्पशक्ती मजबूत ठेवली तर आपण यशस्वी होऊ. या संकटाचं संधीत रुपांतर केलं पाहिजे. हा काळ आपल्याला टर्निंग पाँइंट बनवायचा आहे. आता टर्निंग पाँईंट म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर, टर्निंग पाँईंट म्हणजे आत्मनिर्भर भारत. गेल्या अनेक वर्षांपासून आपण आत्मनिर्भर बनण्याचं काम करत आहोत.
  • भारतातील उत्पादनांना नीति आणि रीति मिळावी म्हणून गेल्या ५ ते ६ वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. आता कोरोनाकाळात या प्रक्रियेला गती देण्यात येणार आहे.

 

News English Summary: Today we have to import many goods from abroad. We have to think about how those things will be made in India. We also have to see how we can export them. This is the time to be vocal for the locals. Major changes have been announced under Self-Reliant India.

News English Title: PM Narendra Modi addresses Indian Chamber of commerce Corona virus lockdown Kolkata video conference News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या