30 April 2025 2:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स सेक्टर कंपनी शेअर्स खरेदी करून ठेवा, मोठा अपसाईड परतावा मिळेल - NSE: BEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सवर टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, 78 रुपये टार्गेट प्राईस जाहीर - NSE: SUZLON Mazagon Dock Share Price | मल्टिबॅगर शेअर रेकॉर्ड हाय लेव्हलवर, आता मोठ्या तेजीचे संकेत, टार्गेट अपडेट - NSE: MAZDOCK
x

जम्मू-काश्मीरच्या सरकारी कर्मचाऱ्यांना अनिल अंबानींच्या 'आरोग्य विमा' कंपनीचा विमा अनिवार्य? राहुल गांधी

नवी दिल्ली : राफेल करारावरून आधीच चर्चेत आलेले अनिल अंबानी आणि मोदी सरकार पुन्हा नव्या वादात येण्याची शक्यता. कारण अनिल अंबानींच्या मालकीची रिलायन्स जनरल इन्शुरन्स लिमिटेडकडून आरोग्य विमा खरेदी करण्यासाठी जम्मू-काश्मीरच्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना आदेश देण्यात आल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करून केला आहे.

राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की, जर तुमचे जवळचे मित्र पंतप्रधान असतील तर कोणताही अनुभव नसताना तुम्हाला १,३०,००० कोटी रुपयांचं राफेल कॉन्ट्रॅक्ट सुद्धा मिळू शकतो, पण थांबा! इथे अजून काही आहे! जम्मू-काश्मीरच्या ४ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा खरेदी करणाऱ्यांचे आदेश दिले आहेत, परंतु केवळ रिलायन्स जनरल हेल्थ इन्शुरन्स कडून…… असं ट्विट केलं आहे.

काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीर सरकारने कर्मचाऱ्यांना आदेश दिले आहेत की, कर्मचाऱ्यांनी केवळ रिलायन्स जनरल हेल्थ इंशुरन्स कंपनी लिमिटेड’कडून ८,७७७ रूपये आणि २२,२२९ रुपये (कर्मचा-यांसाठी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी) असा वार्षिक प्रीमियमवर आधारित आरोग्य विमा घ्यावा. या आदेशानुसार राज्यातील सर्व सरकारी (राजपत्रित आणि इतर कर्मचारी) कर्मचारी, विद्यापीठे, कमिशन, स्वायत्त संस्था आणि सार्वजनिक उपक्रमांतील कर्मचाऱ्यांनी तो खरेदी करणे अनिवार्य आहे. हे आदेश १८ सप्टेंबर २०१८ रोजी जम्मू-काश्मीर राज्य सरकारकडून देण्यात आल्याचं वृत्त आहे.

तसेच भारत सरकारच्या काही आरोग्य योजनांशी सुद्धा या कंपनीला जोडण्याचा प्रकार होत असल्याचे आरोप सुद्धा काँग्रेस कडून करण्यात ये आहे. आधीच राफेल करारावरून मोदी सरकार अडचणीत असताना रिलायन्सच्या आरोग्य विम्याच्या माध्यमातून भाजपच्या अडचणीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या