नवी दिल्ली : केंद्र सरकारने भारतीय लष्कराच्या अतिरिक्त निधीसाठी नकार दिल्याने लष्कराला त्यांच्या अनेक खर्चात कपात करावी लागणार असून अगदी गणवेश आणि इतर साहित्य सुद्धा जवानांना स्वखर्चातून घ्यावं लागणार आहे. परंतु यावरून केंद्र सरकारची उदासीनता समोर आली आहे.
केंद्र सरकारकडून अतिरिक्त निधी न मिळाल्यामुळे भारतीय लष्कराने ऑर्डिन्स शस्त्र फॅक्टरीतून होणाऱ्या एकूणच खरेदीला चाप लावला आहे. देशावर एखादे छोटे युद्ध करण्याची परिस्थिती ओढवल्यास त्या आपत्कालीन परिस्थितीत दारुगोळा घेण्यासाठी भारतीय लष्कराला या पैशांचा सदुपयोग करता येणार आहे.
एकूणच भारतीय लष्कराला पुरवल्या जाणाऱ्या साहित्याचे प्रमाण ९४ टक्क्यांवरून थेट ५० टक्क्यांपर्यंत आले आहे. तसेच या अतिरिक्त निधीत झालेल्या कपातीमुळे लष्कराच्या वाहनांच्या सुट्या भागांच्या खरेदीवर सुद्धा परिणाम होणार आहे.
