30 April 2025 5:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस, 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स देणार ही कंपनी, सुवर्ण संधी सोडू नका SBI Mutual Fund | श्रीमंत करणारी SBI फंडाची योजना, महिना 5,000 रुपये SIP वर मिळेल 2 कोटी 56 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | तुमच्या कुटुंबात सरकारी आहेत का? फिटमेंट फॅक्टर + DA मर्जर; पगारात किती वाढ होईल पहा Home Loan EMI | ईएमआय वर 77 लाखांचं घर घ्यावं की SIP करावी? तुमचा अधिक फायदा कुठे आहे समजून घ्या EPFO Pension Money | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांनो, अन्यथा तुम्हालाही महिना कमी पेन्शन घ्यावी लागेल, ही अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 30 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट; डाऊनसाइड टार्गेट प्राईस अलर्ट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा? - NSE: IRB
x

GDP घसरलाय, RBI कंगाल झाली आहे | आणि सरकारनं कंपन्यांचा मोठा सेल लावलाय

Shiv Sena MP Sanjay Raut, PM Narendra Modi, Company Sell, Marathi News ABP Maza

नवी दिल्ली, १७ सप्टेंबर : खासगीकरणाविरोधात शिवसेनेने लोकसभेत आवाज उठवला आहे. खासदार संजय राऊत यांनी आज राज्यसभेत याबाबत प्रश्न विचारुन मोदी सरकारला धारेवर धरत याप्रश्नी आवाज उठवला. जेएनपीटी, एअर इंडिया, एलआयसी यांचे खासगीकरण करू नका, असे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत म्हटले आहे. खासगीकरण झाल्यास अनेकांच्या नोकऱ्या जातील याकडे संजय राऊत यांनी लक्ष वेधले.

देशाची आर्थिक स्थिती अत्यंत गंभीर आहे, आता परिस्थिती अशी आहे की आमचा जीडीपी आणि आमची आरबीआयही दिवाळखोर झाली आहे, अशा परिस्थितीत सरकारने एअर इंडिया, रेल्वे, एलआयसी आणि इतर बर्‍याच ठिकाणी विक्रीसाठी मोठी विक्री आणली आहे. यात जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचा समावेश आहे, असे संजय राऊत म्हणालेत.

सरकार जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट खासगी कंपनीकडे देण्याचा विचार करत आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट जगातील सर्वात मोठं बंदर आहे. त्यातून भारत सरकारला ३० टक्क्यांपेक्षा अधिक नफा मिळतो. असं महत्त्वपूर्ण बंदर खासगी कंपनीच्या हाती देणं राष्ट्री सपत्तीचं मोठं नुकासान असल्याचंही राऊत म्हणाले.

सहा कंपन्यांची विक्री:
स्कूटर्स इंडिया, हिंदुस्तान फ्लोरोकार्बन लिमिटेड, भारत पंप्स अँड कंप्रेसर्स लिमिटेड, हिंदुस्तान प्रीफॅब, हिंदुस्तान न्यूजप्रिन्ट आणि कर्नाटक अँटीबायोटिक अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेड या कंपन्या बंद करण्यावर सरकार विचार करत आहे. नीति आयोगाच्या निर्गुतवणुकीच्या निकषांनुसार सराकरनं २०१६ पासून ३४ कंपन्यांमध्ये निर्गुतवणुकीला मंजुरी दिली आहे. यापैकी ८ कंपन्यांमधील निर्गुतवणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर अन्य ६ कंपन्या बंद करण्यावर विचार सुरू आहे. याव्यतिरिक्त २० कंपन्यांमधील निर्गुतवणुकीची प्रक्रिया निरनिराळ्या टप्प्यांवर असल्याची माहिती अनुराग ठाकूर यांनी विचारलेल्या प्रश्नाला लेखी स्वरूपात दिली होती.

 

News English Summary: Shiv Sena has raised voice in the Lok Sabha against privatization. MP Sanjay Raut raised the issue in the Rajya Sabha today, taking the Modi government by storm. Don’t privatize JNPT, Air India, LIC, says MP Sanjay Raut in Rajya Sabha.

News English Title: Shiv Sena MP Sanjay Raut Criticize PM Narendra Modi BJP Government company Sell GDP Rbi Rajya Sabbha Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या